...तर कॉंग्रेसला जुनी पावती पुस्तके फाडून फेकावी लागतील : सुधीर मुनगंटीवार

कॉंग्रेस कार्यालयात सदस्यत्वाच्या पावती पुस्तकामध्ये पावतीच्या मागे लिहीले असते की, "मी दारु पिणार नाही', ही पावती पुस्तके आता त्यांना पाडून फेकावी लागतील आणि नवीन पावती पुस्तके तयार करावी लागतील, असे राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
...तर कॉंग्रेसला जुनी पावती पुस्तके फाडून फेकावी लागतील : सुधीर मुनगंटीवार

नागपूर : कॉंग्रेस कार्यालयात सदस्यत्वाच्या पावती पुस्तकामध्ये पावतीच्या मागे लिहीले असते की, "मी दारु पिणार नाही', ही पावती पुस्तके आता त्यांना पाडून फेकावी लागतील आणि नवीन पावती पुस्तके तयार करावी लागतील, असे राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार बाळू धानोरकर यांनी निवडून आल्या-आल्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याची मागणी केली. त्यावर आज येथीन वनामती सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

कॉंग्रेसने आपही उपयुक्तता गमावली आहे. पण कॉंग्रेसमध्ये सुद्धा काही सेवाभावी लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे, जे सेवाभावाने राजकारण करतात, त्यांना सोबत घेतले पाहीजे. कॉंग्रेसमधील सेवाभावींना आम्ही भाजपमध्ये घेणार आहोत. म्हणजे आता "राईट पर्सन्स, राईट
पार्टीत' येतील आणि "रॉंग पर्सन्स, रॉंग पार्टीत'च राहतील, असेही ते म्हणाले. 

औषधाप्रमाणे कॉंग्रेसची एक्‍स्पायरी डेट संपल्याचे विधान आज
सकाळी त्यांनी अमरावती येथे प्रसार माध्यमांसमोर केले होते. त्यासंदर्भात छेडले असता त्यांनी उपरोक्त विधान करुन काही कॉंग्रेसींना भाजपमध्ये प्रवेश देणार असल्याच्या चर्चांना विराम दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com