या सरकारने आदित्य ठाकरेंच्या लग्नालाही स्थगिती दिलीय!

हिंगणघाट प्रकरणात गृहमंत्री पीडितेला भेटायला गेले नाहीत, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
sudhir mungantiwar comment on aditya thackreys marraige
sudhir mungantiwar comment on aditya thackreys marraige

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. या सरकारने आदित्य ठाकरे यांच्या लग्नालाही स्थगिती दिली आहे, अशी टोलेबाजी भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी केली. 

आझाद मैदानातील भाजपच्या एल्गार आंदोलनात मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, या सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, ते कोणतीही नशा न करता दिले होते का, असा प्रश्न पडतो. हे सरकर खोटं बोलणाऱ्यांचं आहे. त्यांना स्मरणशक्तीची गोळी द्यायला हवी. गजनी सिनेमामध्ये अमिर खान विसरायचा हे तर गजनीचे बाप आहेत. ते कधी कर्जमुक्ती करणार आहेत?
 
राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार आहे. त्यांनी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली, तशी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या लग्नालाही स्थगिती दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात अयोध्येला जाणार तर त्यांचे मार्गदर्शक म्हणतात अयोध्येत मशिदीसाठी ट्रस्ट करा. सरकारमध्ये जागोजागी विसंगती असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com