टोल्याला प्रतिटोला देताना सुधीरभाऊ `जखमी` : शिवसेेनेची `फसवणूक` आली अंगावर

अजित पवार यांनी चुकीला माफी नाही, म्हटल्यानंतर भाजपही अडचणीत आला.
sudhir mungantiwar about shivsena
sudhir mungantiwar about shivsena

मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटिवार यांनी काल विधानसभेत केलेले वक्तव्य भाजपच्या अंगलट आलेले आहे. शिवसेनेला आम्ही फसविले, असे जे मुनगंटिवार बोलले त्यापासून त्यांनी आज फारकत घेतली. ते विधान टोल्याला प्रतिटोला होते, अशी सारवासारव त्यांनी केली.

याबाबत मुनगंटिवार यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून भारतीय जनता पक्ष हा राजकारणात विशिष्ट मूल्ये घेऊन काम करतो आहे, असा दावा त्यांनी केला.

त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष आहे. शिवसेना आणि आमची अनेक वर्षांची युती होती. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचे माझे वक्तव्य आहे. ज्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळाले त्या शिवसेनेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या गेल्याच नाहीत. एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच आहे, असे मी म्हणालो.

यावेळी समोरच्या बाकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने ' भाजपाने चूक केली म्हणून शिवसेना आमच्याकडे आली,' असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मी उपाहासात्मक उत्तर दिले. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. 
अनेक वर्षे मित्र असलेल्या पक्षाला फसविण्याची आमची वृत्ती नाही. अकाली दलासारख्या पक्षाबरोबर आमची ४०-५० वर्षांपासूनची युती आहे. शिवसेनेबरोबरही ३० वर्षे आमची मैत्री होती. मित्रपक्षाला फसवण्याचे काम आमच्या हातून कधीच झालेले नाही आणि भविष्यातही होणार नाही. माझ्या वक्तव्याचा कृपा करून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये.

विधानसभा निवडणुकीतील संभाव्य युतीविषयी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये भाजपाच्या वतीने शिवसेनेला तसा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता. त्यामुळे फसवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विधिमंडळातील भाषणादरम्यान एकमेकांवर कुरघोडी करताना कधीकधी अतिशयोक्ती केली जाते किंवा टोल्याला प्रतिटोला हाणला जातो. विधिमंडळात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अशा शाब्दिक चकमकीचे अनेक किस्से आठवत असतील. त्यामुळे माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com