फडणविसांना उघडे पाडणारे वाक्य मुनगंटिवार का बोलले?

शिवसेनेला आम्ही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल नव्हता, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याला छेद देणारे वाक्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटिवार बोलून गेले. त्यामुळे शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली.
sudhir mungantiwar- devendra fadnavis
sudhir mungantiwar- devendra fadnavis

मुंबई ः विधानसभा निवडणुकीअगोदर शिवसेना- भाजपमध्ये जे ठरलं होतं, त्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी फारकत घेतली. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. याबाबत सुतोवाच करताना ‘होय आम्ही फसवलचं. आमची चूक झाली. ही चूक आम्ही कधीतरी दुरुस्त करू,’ अशी कबुली देत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.

अर्थसंकल्पी चर्चेत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुमची मैत्री तीन महिन्यांची आहे; पण आम्ही तीस वर्षं मित्र होतो.’’ त्यावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी ‘म्हणूनच तुम्ही फसवलं का?’ असा टोला लगावला.

त्यावर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत, ‘‘होय आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला; पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू,’’ असा पलटवार केला. ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरलं तो शब्दच भाजपने फिरवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला व भाजपसोबतची युती मोडीत काढली. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी आज हे सत्यच समोर आणले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com