राणेंविषयी आधीच सांगीतले तर पेपर फुटेल : सुधीर मुनगंटीवार

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयीचा निर्णय झाला आहे. योग्य वेळी त्याची माहिती देऊ. आधीच सांगीतले तर पेपर फुटेल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकला जाहिर सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्यासाठी ते येथे आले आहेत.
Narayan Rane - Sudhir Mungantiwar
Narayan Rane - Sudhir Mungantiwar

नाशिक  : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयीचा निर्णय झाला आहे. योग्य वेळी त्याची माहिती देऊ. आधीच सांगीतले तर पेपर फुटेल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकला जाहिर सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्यासाठी ते येथे आले आहेत. 

यावेळी ते म्हणाले, ''शिवसेना भाजपची महायुती होणारच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. यात बदल नाही. आमची  मेगाभरती म्हणजे नोकर भरती नाही. तिकीट देताना जुन्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाईल, जर त्या निष्ठावन्त कार्यकर्त्यांना डावलून पुढे जाणं, हे पक्षाला नुकसानकारक असेल. आमच्याकडे येणारे लोक आम्ही तपासून घेत आहोत. नारायण राणे यांच्या विषयी तपासणी नंतर सर्व काही तुम्हाला समजेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com