फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री : सुधीर मुनगंटीवारांची गुगली

आमची स्थिर सरकार बनवण्याची तयारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल, अशी गुगली राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाकली आहे. कितीही प्रयोग झाले तरी भाजप-शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
Devdendra Fadanavis - Sudhir Mungatiwar
Devdendra Fadanavis - Sudhir Mungatiwar

मुंबई : आमची स्थिर सरकार बनवण्याची तयारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल, अशी गुगली राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाकली आहे. कितीही प्रयोग झाले तरी भाजप-शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार म्हणाले, " आज दोन वाजता आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत..
 राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करणार आहोत. नऊ तारखेला सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होईल. काल कोर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. भाजप सरकार स्थिर सरकार देण्यासाठी तयार आहे. शिवसेनेसोबत काही स्तरावर चर्चा सुरू आहे. अल्प मताचे सरकार भाजप बसवणार नाही."

ते पुढे म्हणाले, "स्थिर सरकार बसविण्याची आमची तयारी आहे. आमदारांचे अपमान कोणी करत नाही. आमदारांचा सन्मानच ठेवला जात आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्रीच होईल. देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भावाचे नाते आहे." नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात कधीच परत येणार नाहीत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com