"अबकी बार 220 पार ' आणि मुख्यमंत्रीही भाजपचाच - मुनगंट्टीवार

"अबकी बार 220 पार ' आणि मुख्यमंत्रीही भाजपचाच - मुनगंट्टीवार

नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नही तोडेंगे, असे म्हणत अबकी बार 220 पार या न्यायाने एकदिलाने काम करुन राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायच्या आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहे. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. असा दावा राज्याचे अर्थ,नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी केले. 

नाशिक विभागातील वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आलेल्या श्री मुनगंट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ते म्हणाले,भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बैठक घेत आगामी विधानसभा निवडणूकांच्या तयारीबाबत कार्यकर्त्याना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एकदिलाने राज्यातील निवडणूकांना सामोरे जातांना भाजपच्या कार्यकर्त्यानी प्रामाणिकपणे युतीच्या उमेदवारांचे काम करावे. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसला पाहिजे, यासाठी युतीच्या 220 जागांसाठी कार्यकर्ते पूर्ण क्षमतेनिशी काम करणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधी पक्षाचेच काम करावे 
श्री मुनगंट्टीवार यांनी, "राष्ट्रवादी कॉग्रेसला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अतिशय जबाबदारीने विरोधी पक्षाचे कामकाज पहात आहे. त्या पक्षाला वर्धापनदिनी मी सुध्दा खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील 25 वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेसने अशाच पध्दतीने जबाबदारीने विरोधी पक्षाचे काम करत राहावे. या माझ्याकडून त्या पक्षाला शुभेच्छा. असे सांगतानांच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com