सुधाकर देशमुखांचे प्रचार यात्रेद्वारे मतदारांना आवाहन

सुधाकर देशमुखांचे प्रचार यात्रेद्वारे मतदारांना आवाहन

नागपूर - पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी बाइक रॅलीने जगदीशनगर, दीपकनगर, सुरेंद्रगड, मानवसेवानगर, गोविंद गौरखेडे ले-आउट, जागृती ले-आउट, फ्रेण्ड्‌स कॉलनी या परिसराचा दौरा करून मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. या यात्रेत कार्यकर्त्यांसह मतदारही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

प्रचारयात्रेत मंडळ अध्यक्ष किसन गावंडे, माजी महापौर माया इवनाते, सतीश वडे, अशोक डोर्लीकर, नरेश बरडे, आरीफ खान, विक्रम ग्वालबंशी, सुरेश गुप्ता, रंजना गुप्ता, अरुणा ग्वालबंशी, सुनील मौर्य, रमेश जोशी, सुरेश गुप्ता, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र सिंग, महामंत्री देवेंद्र जैस्वाल, संजय विश्‍वकर्मा, जितेंद्र पाटील, सविता चव्हाण, गोकुलदास पाटील, विठ्ठल देवादे, भीमराव शेंडे, सुनील मानापुरे, मनीष महल्ले, अतुल फुलसुंगे, आशीष कटरे, साहेबराव कुहिले, श्रीकांत शिखरे, मंगेश मेश्राम, व्यंकटेश राज, रामभाऊ राऊत, अशोक बगडते, विस्तारक चेतराम हारोडे, शशिकांत हरडे, अमर खोडे, रणदिवे, शोभा पेडलकर, सुरेश कोंगे, विशाल वानखेडे, कमलेश पांडे, योगेश पाचपोर, प्रमोद क्षीरसागर, फरहा वसीम, शशिकांत हरडे, विनोद बघेल, उदय मिश्रा, नीलेश धावडे, कविता गोतमारे, राखी शिंगारे, भाजयुमोचे पश्‍चिम नागपूर पदाधिकारी, सर्व बुथप्रमुख व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्‍चिम नागपुरात दहा वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनता केलेल्या कामावरच मत देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहराला देशातील नामांकित शहरांच्या यादीत नेले. अनेक योजना अद्याप सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर नागपूर शहराचे चित्र पालटेल. जनता पुन्हा एकदा विकासकामांना मतदान करून भाजपला सत्तेवर बसवणार असल्याचा विश्‍वास या वेळी सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com