नंदीवाल्या मारूतीची फौजदारपदास गवसणी : भटक्‍या जाती प्रर्वगामध्ये राज्यात पहिला - succsess of govind in psi exam | Politics Marathi News - Sarkarnama

नंदीवाल्या मारूतीची फौजदारपदास गवसणी : भटक्‍या जाती प्रर्वगामध्ये राज्यात पहिला

राजकुमार थोरात
शुक्रवार, 8 मार्च 2019

वालचंदनगर ः लासुर्णे (ता. इंदापूर) येथील नंदीवाला समाजातील मारुती गोविंद वाघमारे या तरुणाने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून फौजदारपदाला गवसणी घातली आहे. भटक्‍या जाती प्रर्वगातून त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. मारुतीचे हे यश समाजातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

वालचंदनगर ः लासुर्णे (ता. इंदापूर) येथील नंदीवाला समाजातील मारुती गोविंद वाघमारे या तरुणाने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून फौजदारपदाला गवसणी घातली आहे. भटक्‍या जाती प्रर्वगातून त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. मारुतीचे हे यश समाजातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 
राज्यातील नंदीवाल्या समाजातील अनेक कुटुंबे आजही पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होतो. शिक्षणासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या समाजाची मुले शिक्षणाऐवजी पारंपारिक व्यवसायात गुंतात. मात्र, लासुर्णे (ता. इंदापूर) येथील मारुती वाघमारे या तरुणाने सर्व अडचणींवर मात करून हे यश मिळविले.

मारुती याची घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण बोरी येथे, तर माध्यमिक शिक्षण लासुर्णे येथील नीलकंठेश्‍वर विद्यालयात झाले. उच्च शिक्षण बारामतीच्या टी. सी. कॉलेजमध्ये घेतले. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मारुतीने भरणेवाडीतील भगवानराव भरणे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात पोलिस भरतीचे मोफत प्रशिक्षण घेतले.

त्याने 2017 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, त्याचा निकाल आज जाहीर झाला. त्यात मारुतीची फौजदारपदी निवड झाली. वाघमारे याची खुल्या वर्गातून 139 रॅंक असून भटक्‍या जाती प्रवर्गातील "ब'मधून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.

प्रशिक्षण केंद्रातील नितीन खरात, ऍड. किरण धापटे, साईदास पवार, प्रकाश चव्हाण यांनी त्याला मार्गदर्शन केले. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख