Subodhkumar Jaiswal Likely to be Appointed as Delhi Police Commissioner
Subodhkumar Jaiswal Likely to be Appointed as Delhi Police Commissioner

राज्याचे पोलिस महासंचालक दिल्ली पोलीस आयुक्तपदी?

जयस्वाल यांनी केंद्रीय गृप्तचर संस्था असलेल्या रॉ आणि आयबी मध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. त्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे

मुंबई  : महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे प्रतिनियुक्तीवर पुन्हा एकदा दिल्लीत जाण्याची शक्‍यता असून, या ठिकाणी त्यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्‍यता असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत केंद्रीया गृहमंत्री अमित शहा या बाबतीत निर्णया घेणार असून, त्याबाबतची परवानगी दिल्लीमध्यो निवडणूक आयोगांकडे देखील मागितल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जयस्वाल यांनी केंद्रीय गृप्तचर संस्था असलेल्या रॉ आणि आयबी मध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. त्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय जाहीर होईल, अशी शक्‍यता आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. त्यांचे नाव गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. दिल्लीत सध्या निवडणूक सुरू असल्याने आयोगाची परवानगी घेणे गरजेचे आहे. 31 जानेवारीला दिल्लीचे सध्याचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे निवृत्त होत आहेत. दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदी कुणाची नियुक्ती केली पाहिजे याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. त्याचे पालन करीतच नवी नियुक्ती केली जाते.

या निर्देशांचे पालन करीत ही नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार विविध राज्यांमधल्या तीन ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उमेदवार म्हणून निवड केली जाते आणि त्यामधून एकाची दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होते. त्या अधिकाऱ्याची कारकिर्द ही उत्तम आणि स्वच्छ असावी, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलेले होते. सुबोध कुमार जयस्वाल हे यापुर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त होते. ते सध्या राज्याचे महासंचालक आहेत. केंद्रात आणि रॉमध्योही त्यांनी काम केले आहे. त्यांना केंद्रातही सचिवपदावर काम करण्याचा अनुभव आहे. 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते सहभागी होते. तसेच मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले होते. हा सर्व दांडगा अनुभव पाहता, जयास्वाल यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता असल्याची महिती अधिकृत सुत्रानी दिली.

पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तपदी जोरदार रस्सीखेच

दरम्यान, जयस्वाल दिल्लीत गेले तर त्यांच्या जागी अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्यो संजय पांडे, डी कनकरत्नम, के व्यंकटेशम तसेच हेमंत नगराळे यांची नावे चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे पुढील महिन्यांत मुंबईचे पोलीस आयुाक्त संजय बर्वे देखील निवृत्त होत आहेत. यामुळे त्यांच्या जागी देखील हेमंत नगराळे, परमबीर सिंग यांची नावे चर्चेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com