शरद पवार, राज ठाकरेंच्या सभेसाठी सुभाष झांबड यांचे कॉंग्रेस कमिटीला साकडे

शिवसेना, एमआयएम या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या त्या पक्षांचे नेते औरंगाबादेत प्रचार सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. कॉंग्रेसने देखील सुभाष झांबड यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कमिटीला साकडे घातले आहे.
शरद पवार, राज ठाकरेंच्या सभेसाठी सुभाष झांबड यांचे कॉंग्रेस कमिटीला साकडे

औरंगाबाद : शिवसेना, एमआयएम या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या त्या पक्षांचे नेते औरंगाबादेत प्रचार सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. कॉंग्रेसने देखील सुभाष झांबड यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कमिटीला साकडे घातले आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे सुभाष झांबड हे निवडणूक लढवत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांनी थेट संपर्कावर भर देत प्रचाराला सुरवात केली आहे. शहरातील पाणी, कचरा, रस्ते, वाढती बेरोजगारी या प्रश्‍नांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रफितीच्या माध्यमातून झांबड मतदारांना परिवर्तन घडवण्याचे आव्हान करत आहेत. राज ठाकरे यांच्या नांदेड, सोलापूर येथील सभा प्रचंड गाजल्या. राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर टिका करतांना ते आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत असल्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसऱ्या टप्यातील मतदान उद्या झाल्यानंतर हे सगळे बडे नेते तिसऱ्या टप्यातील प्रचारात सक्रीय होतील.

औरंगाबादेत 23 एप्रिलला मतदान होणार असल्याने आता शेवटच्या टप्यात कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार सभा घ्याव्यात यासाठी झांबड यांनी प्रदेश कमिटीकडे पत्र पाठवल्याचे समजते.  मनसेचे राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह नवज्योतसिंग सिध्दू, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आदींच्या जाहीर सभा घ्याव्यात असे पत्र झांबड यांनी नुकतेच पाठवले आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी यापैकी काही नेत्यांच्या सभा औरंगाबादेत होण्याची शक्‍यता सुत्रांनी वर्तवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com