subhash shinde's memories about sharad pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

'किसन वीरांच्याकडे सोड' असे म्हणत पवार माझ्या बुलेटवर बसले!

सुभाष शिंदे (राष्ट्रवादी नेते, फलटण) 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस.

1970 मधील घटना आहे. शरद पवार पुण्याहून एसटीने सातारला येणार होते. याची कुणकुण मला लागली होती. त्यामुळे मी दोन दिवस आधीच साताऱ्यात जाऊन थांबलो होतो. ते ज्या दिवशी साताऱ्यात येणार होतो त्यादिवशी मी सातारा बसस्थानक परिसरात मित्रांसोबत थांबलो होतो. शरद पवार एसटीतून स्थानकावर उतरले. त्यांनी मला पाहून हाक मारली आणि मी त्यांच्याकडे धावत गेलो. त्यांनी मला जिल्हा बॅंकेत किसन वीरांच्याकडे सोड असे सांगितले. त्यावेळी माझ्याकडे बुलेट होती. शरद पवार आणि मी एका बुलेटवरून पोवईनाक्‍यावरील जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात गेलो. जाताना श्री. पवार यांनी माझ्याकडून फलटणचे राजकारण, समाजकारण व तेथील युवकांची स्थिती या विषयीची माहिती जाणून घेतली. या अल्प प्रवासातही त्यांनी माझ्याकडून फलटण तालुक्‍यात नेमके काय चालले हे जाणून घेतले. श्री. पवार यांनी त्यावेळी माझ्या बुलेटवरून केलेला अल्प प्रवास माझ्या आजही स्मरणात आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख