आजचा वाढदिवस - सुभाष साबणे, आमदार  - subhash sabane mla shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस - सुभाष साबणे, आमदार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघातून सुभाष साबणे हे दोन वेळेस निवडून आले आहेत. त्यांचे वडील पिराजी साबणे हे ही दहा वर्षे आमदार होते. सध्या ते देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवसेनेचे मराठवाडा पक्ष प्रतोद म्हणून ते काम पाहत आहेत. यंदा मराठवाड्यात तसेच देगलूर - बिलोली तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वाढदिवस साजरा करणार नसून कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, बॅनर, हार तुरे आदींवर खर्च करू नये. त्याऐवजी ती रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख