माजी आमदार सुभाष धोटेंना जामीन

माजी आमदार सुभाष धोटेंना जामीन

चंद्रपूर : अत्याचारग्रस्त आदिवासी मुलींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी आमदार सुभाष धोटे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी (ता.15) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. राजुरा येथील नामांकित शाळेच्या वसतिगृहातील आदिवासी मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर पाच कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 

माजी आमदार सुभाष धोटे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थाध्यक्ष म्हणून संस्थेची बाजू मांडण्यासाठी ते माध्यमांसमोर आले असताना, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद आदिवासी समाजात उमटले. धोटे यांना कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. चंद्रपुरातील रामनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणात जामीन मिळावा, यासाठी धोटे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले होते. तिथे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. तेव्हा जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर ते पुन्हा उच्च न्यायालयात गेले. यावेळी मात्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com