आजचा वाढदिवस ः सुभाष देसाई, शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री  - subhash desai birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस ः सुभाष देसाई, शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 जुलै 2018

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाहिले जाते. मुंबईतील गोरेगाव ही देसाईंची कर्मभूमी. गोरेगाव हा एकेकाळी समाजवादी मंडळींचा बाल्लेकिला म्हणून ओळखला जात असे. पुढे देसाई यांनी आपल्या कार्याची छाप पाडत गोरेगावचा आमदार शिवसेनेचा करून दाखविला. ते स्वत: येथून निवडून आले होते. प्रबोधन या सामाजिक संस्थेमार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. देसाई हे 1990, 2004 आणि 2009 मध्ये गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाहिले जाते. मुंबईतील गोरेगाव ही देसाईंची कर्मभूमी. गोरेगाव हा एकेकाळी समाजवादी मंडळींचा बाल्लेकिला म्हणून ओळखला जात असे. पुढे देसाई यांनी आपल्या कार्याची छाप पाडत गोरेगावचा आमदार शिवसेनेचा करून दाखविला. ते स्वत: येथून निवडून आले होते. प्रबोधन या सामाजिक संस्थेमार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. देसाई हे 1990, 2004 आणि 2009 मध्ये गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार आहेत. भाजपशी युती झाल्यानंतर ते उद्योगमंत्री झाले. ते मुंबईचे पालकमंत्री आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढविली. हिंदुत्वाचा प्रचार केला या कारणाने त्यांची न्यायालयाकडून आमदारकी रद्द झाली होती तसेच त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख