सुभाष देशमुख वाचतायत `भगवत् गीता` : रवींद्र चव्हाण आजही फोनवरच व्यस्त

लाॅक डाऊनमध्ये राजकीय नेतेही सध्या जनतेपासून थेट दूर असले तरी त्यांना संपर्कात राहावेच लागते.
ravindra-chavan-deshmukh-
ravindra-chavan-deshmukh-

नवी मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला वर्क फ्रॉम होम परवानगी दिली असतानाच आता माजी सहकारमंत्री सुभाष देशमुखही `वर्क फ्रॉम होम` करीत आहेत. व्यायाम, नाश्ता तसेच परिवारासोबत चर्चा गप्पागोष्टी करणे असा सकाळच्या सत्रात उरकल्यानंतर दुपारच्या सत्रात पुस्तके वाचनात ते वेळ घालवत आहेत.

विशेष म्हणजे त्यांनी `भगवत् गीता` वाचनाचे काम हाती घेतले आहे. येत्या आठवडाभरात गीता वाचून पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघातील सरपंचांना फोन करणे, त्यांच्याकडून गावांची परिस्थिती समजून घेणे, त्यांना मदत करणे आदी नेहमीची कामे सुरू आहेतच. तसेच राज्य व केंद्र सरकार यांनी दिलेल्या निकषांचे पालन करण्याचेही आवाहन सरपंचांना करावे लागते. मंत्रिपदाच्या कालावधीत अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे तसेच जुन्या लोकांशी संपर्क ठेवतो, असे देशमुख यांनी सांगितले.

फडणवीस सरकारमधील माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की दिवसभरात इतके फोन असतात की त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. कोकणातील पालघर या भागातील नागरिकांचे फोन सतत मला येत असतात. त्यांना मदतीसाठी तत्पर राहावे लागते. एका  नागरिकाला  हॉस्पिटलमध्ये जायचे होते. पण पोलीस सोडत नव्हते. मगण मी पोलीसांना फोन करून त्यांना मदत करा, असे सांगितले. असे फोन दिवसात बऱ्याचदा येतात. माझ्या  डोंबिवली मतदारसंघातील मंडळींना बाहेर पडू नका. त्यांना गरज पडली तर प्रशासनाशी संपर्क साधावा लागतो.  संध्याकाळी बऱ्याच दिवसांनी  परिवारासोबत गप्पागोष्टी करण्याचा आणि एकत्र जेवण करण्याचा आनंद मिळत आहे. त्यातून वेळ मिळाला टिव्ही पाहतो, असे चव्हाण यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com