पिंपरी चिंचवड : आधी अभ्यास मग काम सदाशिव खाडेंचा फंडा 

प्राधिकरणाचा हेतू साध्य करण्यासाठी एक योजना तयार करणार आहे . प्राधिकरणाच्या स्थापनेमागील हेतू 46 वर्षानंतरही साध्य झाला नसल्याची असे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे नवे लोकनियुक्त अध्यक्ष सदाशीव खाडे यांनी शुक्रवारी सांगितले .
Pankaja_Munde_Sadashiv_Khad
Pankaja_Munde_Sadashiv_Khad

पिंपरीः प्राधिकरणाचा हेतू साध्य करण्यासाठी एक योजना तयार करणार आहे . प्राधिकरणाच्या स्थापनेमागील हेतू 46 वर्षानंतरही साध्य झाला नसल्याची असे  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे नवे लोकनियुक्त अध्यक्ष सदाशीव खाडे यांनी शुक्रवारी सांगितले .

एक तप रिक्त राहिलेल्या या पदाचा भार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. हे वक्तव्य करताना त्यांनी आतापर्यंत राज्यात सत्तेत असलेल्या व प्राधिकरणाचे अध्यक्षपद भुषविलेल्या दोन्ही कॉंग्रेसला लक्ष्य केले.

कामगारांना घरे देण्यासाठी 1972 मध्ये हे प्राधिकरण स्थापन झाले. मात्र, ते मूळ हेतूपासूनच भरकटले. घरे देण्याऐवजी ते भुखंड वाटत सुटले. तसेच अधिग्रहित केलेल्या जमिनीपोटी साडेबारा टक्के परतावा शेतकऱ्यांना देण्यातही त्याला गेल्या काही वर्षात अपयश आले.

त्यामुळे प्रश्न गेली कित्येक वर्षे विधीमंडळात नेमाने उपस्थित होत आहे.  त्यामुळे त्यावरच प्रथम इलाज करणार असल्याचे खाडे यांनी पदभार घेताच स्पष्ट केले. त्यासाठी भुमीपूत्र आणि कामगार या दोघांत समन्वय साधून दोघांनाही न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मात्र, त्यासाठी प्रथम अभ्यास करणार असल्याचे ते म्हणाले. आठवडाभराच्या अभ्यासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल देऊन प्राधिकरणाचे भिजत पडलेले प्रश्न सोडविणार असल्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरण हे भविष्यात सर्वसामान्यांना घर देणारी संस्था असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुठल्या कामाला प्राधान्य देणार या व इतर प्रश्नांना त्यांनी अभ्यास करून उत्तर देतो, असे एकच उत्तर सर्व प्रश्नांना दिले.  

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी पुष्पगुच्छ देऊन खाडे यांचे स्वागत केले. यावेळी खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, माऊली थोरात, केशव घोळवे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, संदीप कस्पटे, खाडे यांच्या पत्नी संगिता खाडे, माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे, सीमा सावळे,  योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, प्रियंका बारसे, महिला शहराध्यक्ष शैला मोळक, आशा काळे, अमर मुलंचदाणी,विनायक गायवाड, राजू सावंत, यशवंत भोसले, कैलास कुटे, राजेश पिल्ले, अमृत प-हाड, भीमा बोबडे, अमोल थोरात, राजू दुर्गे, अमित गोरखे आदी नवे जुने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com