Students Stopped Bacchu Kaud Car in Akola | Sarkarnama

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बच्चू कडूंचा अकोल्यात अडविला ताफा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

पालकमंत्री बच्चू कडू आज आपल्या नियोजित दौऱ्यावर  अकोल्यात असता एमआयडीसीतील कार्यक्रम आटपून ते पुढील कार्यक्रमासाठी जात असताना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोर पालकमंत्री बच्चू कडूचा ताफा अडविला

अकोला : पालकमंत्री बच्चू कडू आज आपल्या नियोजित दौऱ्यावर  अकोल्यात असता एमआयडीसीतील कार्यक्रम आटपून ते पुढील कार्यक्रमासाठी जात असताना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोर पालकमंत्री बच्चू कडूचा ताफा अडविला. 

यावेळी कृषी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करणे व शैक्षणिक व इतर शुल्क वस्तीगृह शुल्कासह कमी करून बंद झालेली शिक्षक सवलती सुरू करण्याची मागणी दरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केली.  विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर मुख्य मार्ग असल्यामुळे ताफा अडविल्याने येथे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवारी अकोला दौऱ्यावर आहेत. एमआयडीसी असोसिएशनचा कार्यक्रम आटपून ते एका खाजगी कार्यक्रमाला निघाले होते. दरम्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोर पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनासमोर  जाऊन ताफा अडविला. 

यावेळी विद्यार्थी असल्याचे पाहून पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः गाडीतून उतरले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घेतल्या आणि यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. अमरावती-अकोला मुख्य मार्ग असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ताफा अडविण्यात आल्याने येथे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख