निवडणुकीत उतरलेल्या शेतकरी वैशाली येडेंना स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांची मदत - students hive donation to vaishali yede | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीत उतरलेल्या शेतकरी वैशाली येडेंना स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांची मदत

उमेश घोंगडे
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली येडे यांना 26 हजार 650 रूपयांची मदत ग्रामीण भागातून पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी  पाठविली आहे. या मदतीची माहिती मिळताच वैशाली यांनी भावनिक होत ही मदत मी कधीच विसरू शकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या. 

वैशाली येडे या प्रहार संघटनेच्यावतीने यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणूक लढवित आहेत. येडे यांचे पती सुधाकर हे शेतकरी होते. त्यांनी सात वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. मात्र, त्यातून खचून न जाता त्यांनी नेटाने मुलांना सांभाळले.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन गेल्यावर्षी पुण्यात मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून पुण्यातील विद्यार्थ्यांशी बच्चू कडू यांच्याशी जवळीक निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर येडे या निवडणुकीसाठी उभ्या राहात आहेत, हे समजल्यानंतर पुण्यात अभ्यास करणाऱ्या "एमपीएससी' समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन जमवलेले पैसे येडे यांना पाठविले. 

वैशाली येडे या वंचित घटकाचे प्रतिनिधीत्व करीत असून यवतमाळ-वाशीममधील शेतकरी वर्ग त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहील, असा विश्‍वास "एमपीएससी' समन्वय समितीच्यावतीने राहुल कवठेकर यांनी व्यक्त केला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख