विद्यार्थ्यांनो, महिन्यातून एकदा तरी रुग्णालयात जा ! : बच्चू कडू 

विद्यार्थ्यांनो, महिन्यातून एकदा तरी रुग्णालयात जा ! : बच्चू कडू 

नागपूर ः तुम्ही लोकांना मंदीर, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च आदींमध्ये जावे. पण सोबत रुग्णालयांमध्येही गेले पाहिजे. तेथे तुम्हाला कळेल की तुमची खरी गरज कुठे आहे. जेथे, ज्यांना तुमची गरच आहे. तेथे तुम्ही पोचले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांनी महिन्यातून एकदा रुग्णालयात भेट द्यावी, यासाठी जीआर काढणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आज येथील वसंतराव देशपांडे सभागृहात म्हणाले. 

कडू म्हणाले, की आपल्या देशात कोट्यवधी रुपये खर्च करुन स्मारक बांधली गेली आहे, अजुनही बांधली जात आहेत. पण हा पैसा जेथे गरज आहे, तेथे खर्च झाला पाहीजे. रुग्णालयांनाच स्मारक घोषीत करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा, असा सल्लाही त्यांनी दिला. 

हे सांगताना त्यांच्या मतदारसंघातील एक किस्साही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, "दगड फोडणाऱ्या कुटुंबातील एका महिलेची रुग्णालयात प्रसुती झाली. नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी पाच हजार रुपयांची गरज होती.

तिचा नवरा, कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी खुप प्रयत्न केले. पण पाच हजार रुपयांची व्यवस्था नाही करु शकले. बाळ दगावले आणि तिसऱ्या दिवशी त्या महिलेने ती असलेल्या बेडच्या खोलीत आत्महत्या केली.पाच हजार रुपयांसाठी दोन जीव गेले. 

देशातील स्मारकांना नव्हे तर, रुग्णालयांना पैशांची आवश्‍यकता आहे. हे जर आपण करु शकलो, तर एक चांगला देश उभा राहू शकतो. धार्मिक स्थळी, पर्यटनाला जाणारे लोक नेहमीच दिसतात. पण शहीदांच्या गावात गेले का कुणी, तुमच्यापैकी कीती जण शहीद भगतसिंगांच्या गावात गेले आहेत, असा प्रश्‍न बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांना केला. 

शहीद भगसिंगांच्या गावात जाणारा युवक आज तयार झाला पाहिजे, तेव्हाच आपल्या देशाची लोकशाही बळकट होईल, असे सांगत तिरंग्याचे पाईक व्हा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आर्थिक विषमतेवरही बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांना उदारहणांसह मार्गदर्शन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com