Student's body elections | Sarkarnama

राज्यातील  विद्यापीठांत  विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार की नाही ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांबाबत सरकारकडून नियमावली अद्याप आलेली नाही. सरकारचे आदेश आल्यास याबाबतची तयारी सुरू करण्यात येईल. 
- प्रा. सूर्यकांत शिंदे, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ 

 

सोलापूर    : राज्यातील विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता कमीच दिसत आहे.

सरकारकडून अद्याप विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांबाबत नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेला ऑक्‍टोबर महिन्यात सुरवात होणार असल्याने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांबाबत संदिग्धता आहे. 

विद्यापीठाचा नवा कायदा अमलात आल्यापासून यंदाच्या वर्षी निवडणुका होणार असा सर्व विद्यार्थी संघटनांचा अंदाज होता. या अपेक्षेने सर्वच विद्यार्थी संघटनेने तयारीस सुरवातही केली आहे. मात्र, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांबाबत अद्यापपर्यंत कोणताही आदेश आला नसल्याने यंदा निवडणूका होण्याची खूप कमी शक्‍यता दिसत आहे. 

विद्यापीठामध्ये महत्त्वाच्या मानण्यात येणाऱ्या इतर प्राधिकरणाच्या निवडणूक प्रक्रियेस सुरवात झाली. आता विद्यार्थी संघटनांना प्रतीक्षा आहे, ती विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची. विद्यापीठाने प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयातील प्राध्यापक प्रवर्गातील निवडणुकांच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांविषयी सरकारकडून कुठलेच निर्देश आलेले नाहीत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख