शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्रवादी सोबतच; कार्यकर्त्यांने शरद पवारांना बॉन्डवर लिहून दिले - Student Extended Support To Sharad Pawar on Bond Paper | Politics Marathi News - Sarkarnama

शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्रवादी सोबतच; कार्यकर्त्यांने शरद पवारांना बॉन्डवर लिहून दिले

जगदीश पानसरे
रविवार, 22 सप्टेंबर 2019

मी काय म्हातारा झालो का? अशा शब्दांत कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून शरद पवारांनी तरुणाईला घातलेली साद सगळ्यांनाच भावली आणि साहेब आम्ही तुमच्या सोबतच अशी ग्वाही मराठवाड्यातील युवकांनी पवारांना दिली. 20 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडल्यानंतर ते मुक्कामी होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हॉटेलात गर्दी केली होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे भेट होऊ शकली नव्हती.

औरंगाबाद : अनेक दिग्गज नेते, माजी मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अशावेळी वयाच्या 79 व्या वर्षी पक्षाची पडझड रोखण्यासाठी बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्साह पाहून तरुणाई अक्षरशः भारावून गेली आहे. अशाच एका भारावून गेलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी दादाराव कांबळे यांनी शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर शरद पवार यांना शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्रवादी सोबतच राहणार, कधीच पक्ष सोडणार नाही हे लेखी लिहून दिले आहे. 

मी काय म्हातारा झालो का? अशा शब्दांत कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून शरद पवारांनी तरुणाईला घातलेली साद सगळ्यांनाच भावली आणि साहेब आम्ही तुमच्या सोबतच अशी ग्वाही मराठवाड्यातील युवकांनी पवारांना दिली. 20 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडल्यानंतर ते मुक्कामी होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हॉटेलात गर्दी केली होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे भेट होऊ शकली नव्हती.

हे देखिल वाचा - बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युतीकडून कोण?

डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी शरद पवारांना भेटण्याची तीव्र इच्छा पुर्ण करण्याचा आग्रह धरला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते डॉ. उल्हास उढाण यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या भावना सांगितल्या. त्यानंतर पवारांनी परवानगी देत हॉटेलच्या मिटिंग हॉलमध्ये विद्यार्थ्यांना भेटण्याची व्यवस्था करण्याची सूचना संबंधितांना केली.

आयुष्यभर राष्ट्रवादी सोडणार नाही
दुसऱ्या दिवशी सकाळी शेकडो संशोधक विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला, तर काहींनी आपल्या भावना लेखी पत्राच्या स्वरूपात मांडल्या. यात दादाराव जगन्नाथ कांबळे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याने शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर लिहलेले शपथ पत्र शरद पवारांना दिले.

विद्यार्थ्याने शपथ पत्र का लिहून दिले याचे कुतूहल सगळ्यांनाच होते. शरद पवारांनी जेव्हा त्या शपथ पत्रातील मजकूर वाचला तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि त्याचे कौतुक केले. या विद्यार्थ्याने या शपथ पत्रात नमूद केले की, "मी एक संशोधक विद्यार्थी व आपला कार्यकर्ता आहे, आपल्या विचारांची बांधिलकी जोपासणारा, आपल्या पक्षाची भूमिका अगदी चहाच्या टपरीपासून विद्यापीठातील मेसवर येणाऱ्या शकडो विद्यार्थ्यांच्या समोर माझ्या बोली भाषेतून मांडत असतो. आपल्या सामाजिक आणि वैचारिक विचाराने झपाटलेला मी सामान्य घरातील विद्यार्थी आहे. सध्याच्या काळात पक्षाची होत असलेली वाताहत पाहून माझे मन खिन्न झाले आहे. साहेब कोणी नेते, मंत्री कुठेही गेले असले, तरी मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्या पुरोगामी विचारांचा वसा सांभाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन आणि उभ्या आयुष्यात कधीच पक्ष सोडणार नाही,''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख