नितीन राऊत सोनिया गांधींना म्हणाले....माँ तुझे सलाम!

डॉ. राऊत यांनी ट्‌विट करतानाच त्यांचे चिरंजीव आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत हेही मागे नव्हते. त्यांनीही जरीपटका पोलीस ठाण्यात अर्णबगोस्वामींच्या विरोधात तक्रार दाखल केली. गोस्वामी ट्‌विटरवर ट्रेंड होत असताना डॉ. राऊत यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत ट्विट केले. त्यानंतर त्यांना प्रतिक्रीया आल्या.
Nitin Raut With Congress President Sonia Gandhi
Nitin Raut With Congress President Sonia Gandhi

नागपूर : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी चांगलेच अडचणीत आले आहेत. काल ट्विटर वर 'टॉप फाईव्ह'मध्ये गोस्वामी होते. काही हॅशटॅग अर्थातच विरोधात तर काही त्यांच्या समर्थनार्थ होते. यात राज्याचे उर्जामंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत सोनिया गांधींसोबतचा आपला फोटो 'मॉं तुझे सलाम' असे लिहीत ट्विट केले आणि मी माझा डीपी बदलला, तुम्ही बदलला का?' असे चॅलेंज ट्विटरवर केले. त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. कोरोनाच्या नंतर 'अर्णब गोस्वामी' ही देशातील सर्वात मोठी बातमी बनली आहे. 

डॉ. राऊत यांनी ट्‌विट करतानाच त्यांचे चिरंजीव आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत हेही मागे नव्हते. त्यांनीही जरीपटका पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामींच्या विरोधात तक्रार दाखल केली. गोस्वामीं ट्‌विटरवर ट्रेंड होत असताना डॉ. राऊत यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत ट्विट केले. त्यानंतर त्यांना प्रतिक्रीया आल्या. यामध्ये "मॉ तुझे सलाम आपण भारत मातेला म्हणतो, डॉ. राऊतांसाठी सोनिया भारतमाते समान असतील, तर आमची काही हरकत नाही.' आणि 68 वर्षांचा नेता सोनियांना माँ तुझे सलाम म्हणतोय, अशीही प्रतिक्रिया आली आहे   तर कार्तिक राठी या युझर ने जॉनी एलएलबी या सिनेमातील अक्षयकुमारचा एक फोटो "कुछ तो शरम करो जनाब, कुछ तो शरम करो' ट्विट केलाय. कोरोनाच्या नंतर अर्णब गोस्वामी ही देशातील सर्वात मोठी बातमी बनली आहे. 

रिपब्लिक वाहीनीवरील प्राईम टाईम या कार्यक्रमात बोलताना गोस्वामींनी इटलीवाली सोनिया गांधी' असे म्हणत त्यांच्याबद्दल अनुद्गार काढले. टपालघर हत्याकांडाविषयी सोनिया गांधी अद्याप गप्प का? पालघरमध्ये अन्य धर्माच्या गुरुंची किंवा नेत्यांची हत्या झाली असती तरी त्यांनी मौन बाळगले असते का? पालघर घटनेचा रिपोर्ट आता सोनिया गांधी इटलीला पाठवतील' अशा सूर लावत त्यांच्यावर टिका करण्यात आली. यामुळे देशभरातील कॉंग्रेस नेते चांगलेच चिडले आणि ट्विटरवर शेरेबाजी सुरु झाली.

यामध्ये पुढाकार ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा होता. राऊतांच्या समर्थनार्थ कॉंग्रेस नेत्यांनी ट्विट केले असले तरी काही कॉंग्रेसजनांनी त्यांच्या सोनियांसोबतचा फोटो ट्विट करण्यावर आक्षेप घेतला. केवळ सोनियांचाच फोटो डीपीवर घ्यायला पाहीजे होता, असेही काही कॉंग्रेसजनांचे म्हणणे पडले. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामींनी जे केले, त्याला पत्रकारीता म्हणत नाही, अशा टिका राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत केलेल्या विधानाचा विपर्यास केल्यामुळेही कॉंग्रेस नेते गोस्वामी यांच्यावर चिडलेले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com