फडणवीसांसमोर आव्हान स्ट्राईकरेटचे

महाराष्ट्रात दोन तृतीयांश बहुमत मिळेल अशी युतीतील दोघांनाही खात्री खात्री असली तरी मोदीमय वातावरणात भारतीय जनता पक्षाने किमान 135 जागा स्वबळावर जिंकाव्यात यासाठी प्रयत्न करावेत असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आहे. स्ट्राईक रेट कमाल असावा यासाठी एकेका जागेचा अत्यंत बारकाईने विचार सुरू आहे.
Devendra Fadanavis
Devendra Fadanavis

मुंबई : भाजपने मोठा भाऊ होत अत्यंत उदार अंत:करणाने 120 जागा देण्याची तयारी दाखवली असली तरी शिवसेनेला 130 पासून माघार घेता येणेअशक्‍य झाले आहे. आम्ही 115 वरून 120 वर येतो आहोत, समन्वय महत्वाचा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. असे तरी सेना हा भावनांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे 130 जागांच्या खाली पडते कसे घेणार असा प्रश्‍न उदधव ठाकरे यांना पडला असल्याचे समजते. 

महाराष्ट्रात दोन तृतीयांश बहुमत मिळेल अशी युतीतील दोघांनाही खात्री खात्री असली तरी मोदीमय वातावरणात भारतीय जनता पक्षाने किमान 135 जागा स्वबळावर जिंकाव्यात यासाठी प्रयत्न करावेत असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आहे. स्ट्राईक रेट कमाल असावा यासाठी एकेका जागेचा अत्यंत बारकाईने विचार सुरू आहे. शिवसेनेला न दुखावता त्यांना 120 जागा देण्याची प्राथमिक तयारी भाजपने दाखवली आहे. 115 वरून भाजपचा आकडा पुढे सरकण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे समजते. 

फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांच्याशी काल रात्री विभागवार चर्चा केली ,त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदयोगमंत्री सुभाष देसाई तसेच अन्य काही बडे नेते उपस्थित होते. एकेका जागेचा विचार करताना बाहेरून येणाऱ्या पाच ते सहा नेत्यांसाठी दोन्ही पक्ष मतदारसंघ देण्याच्या प्रयत्नात आहेत. चर्चेत हे बाहेरचे नेते दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. भाजपने मेगाभरतीत बऱ्याच जणांचे इनकमिंग केले.दोघांनीही नव्यांना सामावण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपची गरज मोठी आहे.

त्याच प्रादेशिक भागातील आपापले वर्चस्व राखणे हा सेना- भाजपतील कळीचा विषय झाला आहे.शब्द पाळण्यासाठी शिवसेनेला समवेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहेपण जागांबाबत गुडघ्यावर वाकणे शक्‍य नसल्याचे भाजपला वाटते..युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याची हमीही भाजपने दिली असल्याचे समजते.

सेनेला 120 जागा देण्याची तयारीही दाखवण्यात आली आहे.62 जागा जिंकलेल्या पक्षाला 115 ते 120 जागा पुरेशा नाहीत का असे परवाच्या बैठकीत विचारण्यात आल्याचे समजते. सेनेशी संबंधित एका सुत्राने 135 जागा दिल्याटे दाखवत प्रत्यक्षात काही जागांवर भाजप ऐनवेळी आपला उमेदवार उभा करण्याची शक्‍यता आहे. भाजप नेत्याने आम्ही आमच्या मित्राला योग्य मान देवू हे सांगितले .मात्र कमी जागा लढून त्या अधिकाधिक प्रमाणात जिंकणे हे भाजपसमोरचे आव्हान आहे. 

मित्रपक्ष तसेच सेनेला जागा सोडल्यावर भाजपला केवळ 145 मतदारसंघ लढण्यासाठी उपलब्ध असतील.भाजपचे आगामी सरकारवर वर्चस्व रहावे यासाठी किमान 135 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्‍चित केले आहे. त्यासाठी स्ट्राईक रेट उत्तम ठेवणे तसेच महत्वाचे मतदारसंघ आपल्याकडेच राखण्याचे सूत्र जागावाटपात अंमलात आणावे लागणार आहे. दोन्ही पक्षांनी परवा रात्री झालेल्या बैटकीनंतर परस्परांशी चर्चा करण्यापूर्वी काल दिवसभर गृहपाठ करण्यावर भर दिला. युतीची घोषणा लवकरात लवकर करावी अशी काहींची इच्छा आहे. तर नवरात्रात ती झाल्यास उमेदवारी नाकारलेल्यांना बंडखोरीला जागा रहाणार नाही, असा दुसरा मतप्रवाह आहे.

सिटींग गेटींग
दरम्यान निवडणूक सोपी असली तरी भाजपने अधिकाधिक जागा जिंकाव्यात हे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी विदयमान आमदारांनाच संधी देण्याकडे भाजपचा कल आहे. मुंबईत विदया ठाकूर भारती लवेकर यांच्यासह सरदारतारासिंह यांच्यापर्यंत सर्वांनाच उमेदवारी दिली जाईल. विदर्भात,पुण्यात सेनेला जागा हव्या आहेत. पण विदयमान आमदारांना डावलणार कसे? असा प्रश्‍न केला जातो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com