Storm in Mumbai congress over Urmila's letter | Sarkarnama

देवरा - निरुपम वादात उर्मिलाची कोंडी

सरकारनामा
बुधवार, 10 जुलै 2019

मातेंडकर यांच्या प्रचाराचा खर्च तसेच अन्य व्यवस्था मनसेने उत्तमरित्या निभावल्या ,कॉंग्रेसजन फारसे सक्रीय झाले नाहीत अशी खंत मातोंडकर यांनी वारंवार खाजगीत व्यक्‍त केली होती.

मुंबई :  मुंबई कॉंग्रैसमध्ये मिलिंद देवरा आणि संजय निरूपम या दोन गटात सुरू झालेल्या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनाही ओढले गेले आहे. अभिनेत्री मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान लिहिलेली काही पत्रे आता बाहेर काढण्यात आली आहेत तर नाराज झालेल्या गटाने मातोंडकर यांनी या निवडणुकीत कोणताही पैसा खर्च केला नाही अशी खंत वजा आरोप करण्यास प्रारंभ केला आहे.

 उत्तर मुंबईत संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील या पदाधिकाऱ्यांनी काम केले नाही अशी तक्रार मातोंडकर यांनी मे महिन्यात श्रेष्ठींकडे केली होती. हे दोघेही निरूपम यांच्या जवळचे आहेत. या पत्रात शहर अध्यक्षाच्या सूचनेनुसार हे आपण लेखी कळवत असल्याचा उल्लेख केला आहे. दोन तीन महिन्यांनंतर हे पत्र माध्यमांना  का पुरवले गेले याची चर्चा व्हायलाच हवी अशी मागणी समोर आली आहे. 

भूषण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पक्षासंबंधीची कोणतीही भूमिका मी जाहीरपणे बोलणार नाही. या लोकसभा  मतदारसंघात निरीक्षक म्हणून आलेल्या मुत्तेमवार तसेच आशीष दुवा यांना या संबंधीची पूर्ण माहिती आहे असेही ते म्हणाले. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात आपण पक्षासाठी काम केले हे सर्वजण जाणतात असेही ते म्हणाले.

मातेंडकर यांच्या प्रचाराचा खर्च तसेच अन्य व्यवस्था मनसेने उत्तमरित्या निभावल्या ,कॉंग्रेसजन फारसे सक्रीय झाले नाहीत अशी खंत मातोंडकर यांनी वारंवार खाजगीत व्यक्‍त केली होती. मात्र भूषण पाटील सातत्याने त्यांच्या प्रचारात सक्रीय असत ,त्यांच्याबददलचे प्रतिकूल उल्लेख या पत्रात कसे असा प्रश्‍न आता केला जातो आहे. आज या वादावर नापसंती व्यक्‍त करताना अध्यक्षांच्या  सूचनेवरून  लिहिलेले हे पत्र बाहेर कसे आले अशी विचारणा केली आहे. आपण देशसेवेसाठी राजकारणात आलो असेही त्या म्हणतात.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख