आता घासपीट पुरे झाली, झटपट सरकार स्थापन व्हावे :आ. बच्चू कडू

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांनी शकुंतलेच्या (यवतमाळ-अचलपूर मीटरगेज) गतीऐवजी आता गीतांजली एक्‍स्प्रेसच्या गतीने सरकार स्थापनेसाठी पावले उचलली पाहिजे. -आ. बच्चू कडू
bachhu kadu demands immediate formation of government
bachhu kadu demands immediate formation of government

अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने विचारसरणीबाबत जास्त घासपीट न करता शकुंतलेऐवजी गीतांजलीच्या गतीने राज्यात सरकार स्थापन करावे, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

राज्यपालांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 8 हजार तसेच फळपिकांसाठी 18 हजार रुपये हेक्‍टरी मदतीची घोषणा केली. सद्यस्थितीत सरकार अस्तित्वात असते तर त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला असता. राज्यपालांनी निर्णय घेणे आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेणे यात जमीन अस्मानचे अंतर आहे, असे सांगत शेतकऱ्यांचा फायदा होईलच, असे बच्चू कडू म्हणाले.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी समोर येत असलेल्या दोन-तीन पक्षांनी जास्त घासपीट न करता, विचारसरणीच्या खोलात न जाता किंवा त्याचा जास्त बाऊ न करता, महाराष्ट्राच्या जनतेच्या, शेतकरी व शेतमजुरांच्या भल्यासाठी तातडीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले पाहिजे, अशी विनंती बच्चू कडू यांनी केली. सरकारची स्थापना पाहण्यास महाराष्ट्रातील जनता आतुर आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांनी शकुंतलेच्या (यवतमाळ-अचलपूर मीटरगेज) गतीऐवजी आता गीतांजली एक्‍स्प्रेसच्या गतीने सरकार स्थापनेसाठी पावले उचलली पाहिजे, असे सांगत येत्या 24 वा 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. आमदार बच्चू कडू यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबईत तीन दिवसांपूर्वी राजभवनाला घेराव आंदोलन केले होते. अपक्ष आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com