"त्या' बेताल बोलणाऱ्या मंत्र्यांना आवरा :  सर्वपक्षीय बैठकीत अजित पवार यांची सूचना 

"त्या' बेताल बोलणाऱ्या मंत्र्यांना आवरा :  सर्वपक्षीय बैठकीत अजित पवार यांची सूचना 

मुंबई : राज्यात मराठा युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. सरकार काहीच करत नाही याची चिड निर्माण झाल्यानेच मराठा युवक आक्रमक झाला आहे. मात्र, सरकारचे काही मंत्री मात्र बेताल वक्‍तव्य करून या युवकांच्या मनात अधिकच संताप निर्माण करत असून, अशी वक्‍तव्ये करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सर्वपक्षिय गटनेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली. या बैठकीनंतर ते बोलत होते.

 
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की राज्यातील परिस्थीती अस्थिर आहे. शांततेच्या मोर्चातून काहीच पदरी पडत नाही म्हणून मराठा युवकांचा संयम सुटला आहे. सर्वच पक्षाच्या मराठा आमदारांना व नेत्यांच्या विरोधात या मराठा युवकांच्या मनात चिड आहे. अशा स्थितीत मंत्र्यांनी संयम पाळण्याऐवजी एका मिनीटात सही केली असती असे म्हणत मुख्यमंत्रीच सही करत नाहीत की काय अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, आषाढी वारीत साप सोडण्याचे संदेश पकडल्याचा दावा काही मंत्री करत आहेत. त्यामुळे, मंत्रीमंडळातील सदस्यांचा हा सर्व प्रकार अनाकलनीय आहे. 

 ज्या आंदोलकांनी साप सोडण्याची भाषा केली त्यांचे रेकॉर्डिंग जाहीर करा. उगीच सरधोपट आरोप करून संभ्रम व संशयाचे चित्र निर्माण करू नका. अशा शब्दात अजित पवार यांनी यावेळी सरकारला धारेवर धरले. दरम्यान मराठा आरक्षणासाठी घटनादुरूस्तीची गरज असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुर्ण पाठिंबा आहे. विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाचा प्रस्ताव करून केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रात दोन तृतीयांश बहुमतासाठी इतर सर्व विरोधी पक्षासोबत समन्वय साधण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने आता निर्णायक निर्णयांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com