stop mega recruitment : Padalkar | Sarkarnama

धनगर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मेगाभरती थांबवावी : पडळकर

उमेश घोंगडे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : धनगर आरक्षणाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील धनगर समाज 12 ते 19 डिसेंबर या काळात घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करणार आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारने जाहीर केलेली नोकरभरती स्थगित ठेवावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर यांनी केली आहे. 

राज्य सरकार आरक्षणाच्या विषयात वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोपही या दोघांनी केला आहे. धनगड आणि धनगर या दोन वेगळ्या जाती आहेत, असे सांगून सरकार आरक्षणाचा घोळ घालत आहे. मध्यप्रदेश सरकारने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन राज्य सरकारने परिपत्रक काढले तरी सर्व्हे, समित्या आणि अहवाल यातील कोणताही फार्स न करता सरळ-साध्या पद्धतीने धनगर समाजाला न्याय मिळेल, अशी भूमिका पडळकर व जानकर यांनी मांडली. 

धनगर समाजाला अनुसूजित जमातीत सहभागी करून घेणे राज्य सरकारला सहज शक्‍य आहे. मात्र राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. राज्य सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर आंदोलन व मोर्चे काढण्यात येत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागात मेळावे झाले आहेत. येत्या काळात राज्यभरात या विषयावर जनजागृती करण्यात येईल, असे पडळकर यांनी सांगितले.

धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यास लोकसंख्येच्या आधारे राज्यातील 35 विधानसभा मतदारसंघ धनगर समाजासाठी आरक्षित होती. केवळ या भीतीपोटी आरक्षण देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. सारेच राजकीय पक्ष यास जबादार आहेत. मात्र आता आम्ही गप्प बसणार नाही, असे पडळकर व जानकर यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख