भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांच्या घर, वाहनावर दगडफेक 

मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या निवास्थान आणि पार्किंगमध्ये असलेल्या कारवर अज्ञातांनी दगडफेक करून नासधूस केल्याची घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.
stone pelting on house and vehicle of bhagwat karad
stone pelting on house and vehicle of bhagwat karad

औरंगाबाद : मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या निवास्थान आणि पार्किंगमध्ये असलेल्या कारवर अज्ञातांनी दगडफेक करून नासधूस केल्याची घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.

 दरम्यान हा हल्ला नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप कराड यांनी केला आहे. किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली गेली.

 माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पूर्वचे आमदार अतुल सावे , शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनीही एका स्थानिक वृत्तपत्राला तनवाणी यांच्याविरोधात तिखट प्रतिक्रिया दिली होती .

तनवानी म्हणजे सत्तेसाठी गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा आहे अशा शब्दात कराड यांनी तनवाणी यांच्यावर हल्ला चढवला होता .या पार्श्वभूमीवर आज रात्री कराड यांच्या समतानगर येथील निवासस्थानी व व गाडीवर झालेल्या हल्ल्यात तनवाणी यांचाच हात असल्याचा आरोप कराड यांनी केला आहे .

रात्री आठ वाजेच्या सुमारास आठ ते दहा मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी घर आणि वाहनावर दगडफेक केल्याचे कराड यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले .दरम्यान हा प्रकार घडताच भागवत कराड व भाजपचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असून क्रांती चौक पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com