अपघाताच्या नावाखाली एसटीत कोट्यवधीचा घोटाळा  - stm corruption mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

अपघाताच्या नावाखाली एसटीत कोट्यवधीचा घोटाळा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीत जखमी, अपंग झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून ठाणे जिल्ह्यात तब्बल 1 कोटी 16 लाखाहूनही अधिक रक्कम उकळणाऱ्या एका मोठया टोळीचा महामंडळानेच आज खळबळजनक खुलासा केला. 

या खुलाशामुळे महामंडळातील अनेक अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. अशाच प्रकारची शेकडो प्रकरणे राज्यात असून त्यावरही महामंडळाने शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

मागील वर्षी 23 मार्च रोजी शहापूर जुनवली मार्गावर मुरबीपाडा येथे अपघात झाला होता. यात 1 प्रवासी मृत्यू पावला होता तर 30 प्रवासी जखमी झाले होते. त्यातील काहींना लगेच उपचार करून सोडून देण्यात आले होते तर उर्वरित 13 जणांना  दोन दिवसानंतर उपचार करून सोडून देण्यात आले होते. तर दुसऱ्या एका प्रकरणात ठाणे जिल्ह्यातच कुंदे-भिवंडी बसला 12 सप्टेंबर 2016 अपघात झाला होता त्यात 23 प्रवासी जखमी झाले होते. यातील पहिल्या मुरबीपाडा येथील अपघातात जखमी आणि अपंग झाल्याचा दावा करत काही प्रवाशांनी मोटार वाहन न्याय प्राधिकरण, ठाणे येथे अपील करून 1 कोटी 16 लाख 75 हजार रुपयांचा दावा केला होता. तर कुंदे-भिवंडी  बसमधील प्रवाशांनी 8 लाखाचा दावा केला होता. 

या दोन्हीही प्रकरणात ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड, डिसअबिलिटी सर्टिफिकेट बनावट प्रकारे बनवण्यात आल्याचे लक्षात आल्याने त्याची महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱयांनी चौकशी केली. त्यात कागदपत्रे बनावट तयार करून पैसे उकळण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून त्यासंदर्भात फोजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आज महामंडळाकडून देण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख