महिन्याला 17 हजार किलोमीटर फिरणारे पोपटराव आज निवांत!

अनेक प्रमुख नेते, कार्यकर्ते योग्य संदेश देत आहेत. मात्र नागरिक तो पाळतील काय?
popatrao-pawar
popatrao-pawar

टाकळी ढोकेश्वर : महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा दिवस पुस्तके वाचणे, झाडांना पाणी घालणे, बातम्या पाहणे आणि घरच्यांशी गप्पा मारण्यात जातो. खुप दिवसांनंतर घरच्यांना वेळ देता आल्याचे ते सांगतात.

कोरोनामुळे शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागातही नागरिक घराबाहेर पडत नाहीत. दिवसभर मोठ्या प्रमाणावर बैठका, लोकांसोबत चर्चा दर महिन्याला हजारो किलोमीटर प्रवास करणारे पोपटराव पवार आपल्या गावी हिवरे बाजारमध्ये घरामध्ये थांबुन झाडांना पाणी घालने, वाचन व बातम्या असा दिनक्रम सुरू आहे.

नागरिकांनी देखील घरीच थांबुन आपले कुटुंब व देश वाचावा, असा संदेश पवार यांनी दिला आहे. राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष म्हणुन पवार यांना सात्यायाने राज्यातील विविध गावांमध्ये भेटी द्यावी लागतात.

गावामध्ये राज्यासह इतर देशातुन पवार यांनी केलेली जलसंधारणाचे कामे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर नेहमी गर्दी करत असतात. पहाटे सहाला उठल्यानंतर दिवसभर लोकांना भेटने त्यांच्या गावाविषयी अडचणी समजुन घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करने, परीसरातील गावांमधील सार्वजनिकसह सामाजिक कार्यक्रमांना भेटी देणे व सायंकाळी उशीरा घरी येणे. महिन्यात जवळपास सतरा हजार किलोमीटरचा प्रवास ते करतात. 

यामध्ये अनेक गावांना व त्यामधील सामाजिक कार्यकर्त्यांना ते भेटतात, मात्र हा सर्व उपक्रम आता बंद झाले आहेत. कोरोनो आजाराच्या पार्श्वभूमीवर पवार यांचा रोजचा दिनक्रम पुर्णपणे बदला आहे. पवार हे घरामध्येच थांबुन घराजवळच असलेला बागेतील झाडांना पाणी घालणे, विविध साहित्यिक पुस्तकांचे वाचन करणे आणि दिवसभरातील बातम्या टीव्ही वर पाहणे, घरातील सदस्यांनसमवेत गप्पा मारणे, असा दिनक्रम सुरू आहे.

घरात राहूनच देशसेवा करावी
याबाबत पवार म्हणाले, ``खुप दिवसांनी सर्वांनाच घरच्यानसमवेत असा वेळ घालविण्यासाठी मिळाला आहे. याचा सदउपयोग करा. कोरोना आजाराविरुद्धचे हे युद्ध जिंकायचे असेल, तर आपल्याला काही मोठे काही परिश्रम घ्यायचे नाही. तर प्रत्येकाने घरीच थांबायचे आहे. तीच देशाची मोठी सेवा ठरेल. घरातच थांबुन आपले कुटुंब,समाज, देश व जगाला वाचविण्यास आपण सफल होऊ.``
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com