१ जुलैला राज्यभर 'राज्य मतदार दिवस'साजरा होणार - State voters day will be observed on 1st July every year | Politics Marathi News - Sarkarnama

१ जुलैला राज्यभर 'राज्य मतदार दिवस'साजरा होणार

जयपाल गायकवाड
रविवार, 21 मे 2017

नांदेड - राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी 'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी एक जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.

भारत निवडणुक आयोगाने भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने 'स्वीप' या महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध माध्यमातून मतदारांबरोबर संपर्क साधून त्यांना लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेपासून कोणाताही मतदार वंचित राहु नये यासाठी प्रयत्नशील करायचे आहेत.

भारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि 'स्वीप' कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ 'राष्ट्रीय मतदार दिन' या पुरती मर्यादित राहु नये तर मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतून दरवर्षी राज्यस्तरावर 'राज्य मतदार दिवस' व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा मतदार दिवस साजरा करावा या असे आदेश भारत निवडणुक आयोगाने दिले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख