मेणबत्या पेटवून कोरोना जाणार नाही : हसन मुश्रीफ 

जोखीम पत्करून कोरोनाग्रस्त रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांचे अभिनंदन केलेच पाहीजे, पण पूर्ण कोरोना नष्ट झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू .
hasan mushriff
hasan mushriff

कोल्हापूर : कोरोना रोखण्यासाठी जे डॉक्‍टर, नर्स आणि इतर कर्मचारी काम करत आहेत, ते फार मोठे आहे. हे लोक आपल्या जीवाची बाजी लावून, जोखीम पत्करून कोरोनाग्रस्त रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांचे अभिनंदन केलेच पाहीजे, पण पूर्ण कोरोना नष्ट झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू पण मेणबत्या आणि दिवे पेटवून हा कोरोना जाणार नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद करून मेणबत्या, पणत्या आणि मोबाईलच्या बॅटरी प्रजल्वित करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत श्री. मुश्रीफ यांना विचारले असता ते बोलत होते. ते म्हणाले,"यापुर्वीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कर्मचाऱ्यांच्या आभारासाठी थाळी, टाळी वाजवण्याचे आवाहन केले होते, त्याचे काय झाले ? अनेक लोक रस्त्यावर आले, अनेकांनी मिरवणूक काढल्या त्यातून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. हे आवाहन फार लवकर केले होते.'

ते म्हणाले,"मेणबत्या लावून कोरोना जाणार नाही, हे संकट पूर्ण होण्याची वाट पहायला पाहिजे होती. यापेक्षा आमची पंतप्रधानांकडून वेगळी अपेक्षा होती. त्यांनी आरोग्य सुविधेबाबत काहीतरी भाष्य करणे अपेक्षित होते. व्हेंटिलेटर हवे आहेत, कोरोनाग्रस्तांची व्यवस्था काय आहे यावर त्यांनी बोलायला हवे होते. आजही लोकांत गांभीर्य नाही. त्यामुळे मेणवत्या पेटवतानाही लोक रस्त्यावर येतील, त्यातून निर्माण होणारा धोका मोठा आहे.'
 
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद दिले पाहीजेत. त्यांनी याचा धोका लवकर ओळखला आणि लगेच तातडीची कार्यवाही केली. महाराष्ट्र लॉकडाऊन केलेले पहिले राज्य आहे. आपण लोकल बंद केल्या, विधानसभेचे अधिवेशन संपवले, नंतर लोकसभेचे अधिवेशन संपवले. यावरून याचा धोका महाराष्ट्र सरकारने अगोदरच ओळखला होता, अशा शब्दांत श्री. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com