दुष्काळनिवारणासाठी मंत्री दादा भुसेंनी चंदनापुरीला उधळले भंडारा, खोबरे 

खानदेशचे कुलदैवत असलेल्या चंदनापुरीच्या खंडोबा यात्रेत आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उत्साहाने सहभागी होत जय मल्हारचा जयघोष केला. यावेळी त्यांनी सपत्नीक मंदिरात तळी भरुन भंडारा व खोबरे उधळले. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नागरिकांनी खंडोबाला दुष्काळ निवारणाचे साकडे घातले.
दुष्काळनिवारणासाठी मंत्री दादा भुसेंनी चंदनापुरीला उधळले भंडारा, खोबरे 

मालेगाव : खानदेशचे कुलदैवत असलेल्या चंदनापुरीच्या खंडोबा यात्रेत आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उत्साहाने सहभागी होत जय मल्हारचा जयघोष केला. यावेळी त्यांनी सपत्नीक मंदिरात तळी भरुन भंडारा व खोबरे उधळले. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नागरिकांनी खंडोबाला दुष्काळ निवारणाचे साकडे घातले. 

पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर चंदनपुरीचे जावई अशी श्रध्दा असलेल्या खंडेराव महाराजांच्या पारंपारिक यात्रोत्सवास आज सुरवात झाली. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्नी अनिता यांसह मंदिरात तळी भरली. त्यानंतर येळकोट, येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार-खोबरे उधळत राज्यमंत्री भुसे देवाच्या मुखवट्यांची व काठ्या-कवाडीच्या मिरवणुकीतही तेव्हढ्याच उत्साहाने सहभागी झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळत घोषणा दिल्याने यंदाच्या यात्रेत ग्रामस्थ उत्साहात सहभागी झाले. यामध्ये मुंबई- इंदुर महामार्गावरील चंदनापुरी गाव भंडाऱ्याच्या रंगाने न्हाऊन निघाले. 

आज सकाळी साडेसातला कौतिक अहिरे यांच्या घरातून खंडेराव महाराज, म्हाळसाबाई व बानुबाईचे मुखवटे पालखीसह मिरवणुक निघाली. ढोल, ताषा आणि डीजेच्या दणदणाटात शेकडो तरुण नाचत भंडाऱ्याची उधळण करत होते. गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक मंदिरात आली. मिरवणुकीत अश्‍व नाचविण्यात आले. 20 ते 25 फुटाहून अधिक उंचीच्या देवाच्या काठ्या मिरवत नाचविण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर हजारो भाविकांची गर्दी होती. चंदनपुरीतील रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. मिरवणूक मार्गावर महिलांनी घरासमोर सडा रांगोळ्या टाकून खंडेरायाच्या पालखीची घरोघरी पूजा करून स्वागत केले. मिरवणुकीत हजारो किलो भंडारा उधळला गेला. मध्यरात्रीपासून दिवसभरात पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांनी नवस फेडले. 

आजच्या महापुजेला पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच योगिता अहिरे, उपसरपंच बापू हरपळे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, सतिश पाटील, विनोद शेलार, मनोहर जोपळे, सुर्यकांत पाटील, समाधान उशिरे, कैलास शेलार, मच्छिंद्र शेलार, ग्रामविकास अधिकारी टी. एम. बच्छाव आदी सहभागी झाले होते.

परिसरात तीव्र दुष्काळ आहे. त्याचे निवारण व्हावे. शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त होऊ दे, बेरोजगारांच्या हातांना काम मिळू दे, असे साकडे खंडोबा महाराजांना घातले आहे. त्यासाठी महापूजा केली. परिसराचे कुलदैवत असल्याने मी दरवर्षी श्रध्देने येथे तळी भरण्यासाठी येत असतो - दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com