धनंजय मुंडेंनी चार महामंडळांतील भाजपने नेमलेल्या सदस्यांना घरी पाठविले..

dhanajay munde
dhanajay munde

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या काळात राज्यातील महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ व साहित्यरत्न लोकशाही आण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर झालेल्या अध्यक्षांच्या नियुक्‍त्या आज नव्या सरकारने रद्द केल्या. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सात संचालकांचीही निवड या आदेशाने रद्द ठरवण्यात आली.

नियुक्ती रद्द केलेल्यांत महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे अध्यक्ष राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे (सोलापूर), संत रोहिदास महामंडळाचे अध्यक्ष अशोक विजयकर, आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गणपत गोरखे यांचा समावेश आहे. याशिवाय भैय्यासाहेब बिघाणे-नागपूर, बाबुराव माने-मुंबई, राजेश खाडे-सोलापूर, मयूर कांबळे-मुंबई, दत्तात्रय गोतीशे-नाशिक, विजय गोवळकर, देविदास मंगवडे-दोघेही मुंबई यांची संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावरील संचालक म्हणूनही नियुक्ती रद्द करण्यात आली. शासनाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी या संदर्भातील आदेश आज काढले.

भाजपाच्या काळात विविध महामंडळावर झालेल्या अध्यक्ष व संचालकांच्या नियुक्‍त्या रद्द करम्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास अनुसरून ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अशा अनेक महामंडळावरील नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या संत रोहिदास, महात्मा फुले व आण्णाभाऊ साठे महामंडळावरील नियुक्‍त्या कधी रद्द होणार याची प्रतिक्षा होती. आता या रद्द केलेल्या नियुक्तीवर तिन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. या पदासाठी अनेकांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com