State government's will power is not enough : Harshawardhan Jadhav | Sarkarnama

राज्य सरकारची इच्छाशक्ती कमी पडतेय : हर्षवर्धन जाधव 

मिलिंद तांबे 
मंगळवार, 14 मे 2019

मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत - हर्षवर्धन जाधव

मुंबई : मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत , पण सरकारची इच्छाशक्ती कमी पडतेय, असे आमदार  हर्षवर्धन जाधव  यांनी साम  वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले . 

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची  भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा  केली .  त्यांनतर  हर्षवर्धन जाधव  म्हणाले, " सरकार अध्यादेश काढून या विद्यार्थ्यांची व्यवस्था करू शकते.मात्र या प्रकरणात राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय. या विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सरकारने केलंय. मी औरंगाबाद मधून खासदार म्हणून  निवडून आल्यानंतर या विद्यार्थ्यांचा प्रश्न जो सोडवेल त्याला पाठिंबा देईन."

जयंत पाटील या विषयावर बोलताना म्हणाले ,"  मराठा अरक्षणा बाबत न्यायालयात सरकारने व्यवस्थित बाजू न मांडल्याने ही वेळ आली आहे.विद्यार्थ्यांना याचा परिमाण भोगावा लागत नाही.हे सरकारचे अपयश आहे."

भालचंद्र मुणगेकर  या विषयावर बोलताना म्हणाले ," सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे या विद्यार्थ्यांची फरफट होतेय.सर्वोच्च न्यायालयाचा या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला आक्षेप नाही तर प्रवेश देण्याच्या पद्धतीला आहे.यामुळे सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन यावर तोडगा काढावा."  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख