सोमवारपासून सरकार सुरळीत : प्रफुल्ल पटेल 

राज्यातील तीन राजकीय पक्षांचे सरकार हे समान कार्यक्रमावर आधारित आहे. त्या आधारे ते सुरळीत चालेल. पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करील.
prafulla-patel-final.
prafulla-patel-final.

शिर्डी :  राज्यात तीन पक्षाचे सरकार पहिल्यांदा आले. छोटे मोठ्या अडचणी असतातच. दोन दिवसात खातेवाटप सुरळीत होईल. सोमवार पासून सर्व मंत्री कामकाज पाहू लागतील. असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.


 त्याच बरोबर केवळ सावरकरच नव्हे तर कुठल्याही देशभक्त व महान व्यक्ती बद्दल आक्षेप घेणे अथवा वाद विवाद करणे योग्य नाही, अशी राष्ट्रवादी कॉग्रेस ची भुमिका आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


शनिवारी त्यांनी   साईसमाधिचे दर्शन घेतले. साई संस्थानचे माजी विश्‍वस्त बिपिन कोल्हे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपनगराध्यक्ष नीलेश कोते, दीपक गोंदकर आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी साईसंस्थान च्या वतीने त्यांचे स्वागत केले.


पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल  पटेल  म्हणाले, भाजपने एकाही राजकीय पक्षाला विश्‍वासात न घेता नागरिकत्व सुधारणा कायदा मंजुर केला. त्यामुळे देशातील शांतता बिघडली. या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात युवक वर्गाची  वाढती संख्या चिंतेची बाब ठरली.

महागाई, शेतकरी व मंदीसारख्या समस्यां वरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणला. मात्र एनआरसी मुळे एकट्या आसाम मध्ये सोळा लाख हिंदू, एक लाख गुरखा व दोन लाख मुस्लिमांच्या नागरिकत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. हा कायदा लगेचच आणि घाईने आणण्याची गरज नव्हती.


राज्यातील तीन राजकीय पक्षांचे सरकार हे समान कार्यक्रमावर आधारित आहे. त्या आधारे ते सुरळीत चालेल. पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करील. असा दावा त्यांनी केला. यावेळी साई कोतकर, प्रसाद पाटील, किरण माळी व संजय कोतकर आदि उपस्थीत होते.


भारताची फुटबॉल टिम चे जागतिक मानांकन एकशे शहात्तर वरून चवऱ्यान्नव पर्यत वाढले. युवा खेळाडूंच्या संघांची प्रगती लक्षात घेता पुढील पाच वर्षात भारताचा फुटबॉल संघ जागतिक स्पर्धेत चांगली कामगीरी करेल. असा विश्‍वास माजी मंत्री पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com