ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार!

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
state government positively think on brahman community demands
state government positively think on brahman community demands

कोल्हापूर : प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील तळागाळातील माणसाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. ब्राह्मण समाजाचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही शनिवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या सर्व शाखा ब्राम्हण अधिवेशनाला आजपासून येथील दसरा चौकात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, समाजाची दिनदर्शिका आणि संकेतस्थळाचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले. सकाळी मिरवणूक निघाली. 
जयंत पाटील म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. अल्पसंख्याक दर्जाबरोबरच ब्राह्मण समाजाच्याही काही मागण्या आहेत. त्या मागण्यांबाबत सरकार निश्‍चितच सकारात्मक प्रयत्न करेल.’’ 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com