state government is not distributing grains because of modi hatred says ram kadam
state government is not distributing grains because of modi hatred says ram kadam

मोदी द्वेषापोटीच केंद्राकडून आलेल्या मोफत धान्याचे अद्याप राज्य सरकारकडून वाटप नाही - राम कदम  

केवळ मोदी द्वेषापोटी महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य वाटायला तयार नसल्याची टीका आमदार राम कदम यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतोय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

पुणे - केवळ मोदी द्वेषापोटी महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य वाटायला तयार नसल्याची टीका आमदार राम कदम यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतोय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

आमदार कदम यांनी म्हटले आहे, की केवळ आणि केवळ मोदी द्वेषापोटी मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य ,अजून पर्यंत महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना वाटायला तयार नाही. महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतोय ? मोदी द्वेषापोटी दिवे तुम्ही लावणार नाही आम्ही समजू शकतो. मात्र मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य तुम्हाला वाटायला अडचण काय ? कधी देणार ? तर 15 एप्रिल नंतर ! तोपर्यंत काय बोंबा  मारायच्या ? सरसकट रेशन कार्ड असेल-नसेल प्रत्येकाला मोफत धान्य महाराष्ट्र सरकारने दिलेच पाहिजे . ही आमची आग्रही मागणी आहे.

कर्मचाऱ्यांचा पगार टप्प्यात न देता एकदाच द्या
स्वतःचा जीव धोक्यात घालून  दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तसेच डॉक्टर नर्सेस आरोग्य विभागात त्काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार टप्प्याटप्प्याने  न देता त्यांना पगार  एकदाच वेळेवर दिलाच पाहिजे, अशी मागणी आमदार कदम यांनी केली आहे. 

पगार एकदाच तोही वेळेवर दिलाच पाहिजे आणि या सर्वांना त्याने दिवस-रात्र आपल्या कुटुंबाला सोडून केलेल्या सेवेबद्दल बोनस  देऊन आदर्श  माणुसकीचा सन्मान करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com