राज्यातील मोठे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नगरविकासचे विभाजन ?

तसेच यामुळे प्रमुख शहरातील मोठे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या कामांना गती मिळणार आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नगरविकास-2 विभागाकडून "विशेष प्रकल्प' या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा विभाग कार्यरत होता. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग स्वतःकडे ठेवण्याचा पायंडा पाडल्याने "विशेष प्रकल्प' नगरविकास-2 मध्ये समाविष्ट झाला. आता मोठे प्रकल्प मार्गी लागवण्यासाठी नगरविकास-2 चे पुन्हा विभाजन करण्याची बाब महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.
 राज्यातील मोठे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नगरविकासचे विभाजन ?

मुंबई : राज्याच्या प्रमुख शहरातील मेट्रो, कोस्टल रोड यांसारखे मोठे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी नगरविकास खात्याचे विभाजन करण्याची योजना महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते. नगरविकासच्या नवीन खात्यात राज्यातील सर्व प्रकल्प म्हणजे मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल. हे खाते थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असेल. याबाबतच्या सरकार पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. 
शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या दोन खाती आहेत. यात नगरविकास -1 आणि नगरविकास -2 तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचा समावेश आहे. यापैकी नगरविकास-2 विभागातील विशेष प्रकल्पांसाठी या विभागाचे विभाजन करून नगरविकास-3 असे खाते तयार होण्याची शक्‍यता आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खाते-3 हे नवीन खाते असण्याची शक्‍यता वर्तविली. 

एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाच्या वाटपात स्वतः पुढाकार घेऊन ठाण्यासह नक्षलप्रभावित गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मागून घेतले. सध्या दोन जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. तसेच नगरविकास खात्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याअंतर्गत राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची उभारणी आणि डागडुजी, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग असे अनेक प्रकल्प शिंदे यांच्या अखत्यारीत आहेत. त्यासोबतच पक्षातही संघटन बांधणीत त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. विशेष म्हणजे सत्तास्थापन होण्याआधी शिवसेनेच्या आमदारांची एकत्र मोट बांधण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका होती. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांच्याकडील नगरविकास -2 चे विभाजन झाल्यास त्यांच्याकडील कामाचा भार हलका होणार आहे.

तसेच यामुळे प्रमुख शहरातील मोठे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या कामांना गती मिळणार आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नगरविकास-2 विभागाकडून "विशेष प्रकल्प' या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा विभाग कार्यरत होता. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग स्वतःकडे ठेवण्याचा पायंडा पाडल्याने "विशेष प्रकल्प' नगरविकास-2 मध्ये समाविष्ट झाला. आता मोठे प्रकल्प मार्गी लागवण्यासाठी नगरविकास-2 चे पुन्हा विभाजन करण्याची बाब महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com