कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा रोगच त्यांना जडलाय : बाळासाहेब थोरात 

दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का ?
balasaheb thorat
balasaheb thorat

संगमनेर (नगर) : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, देश एका गंभीर संकटाचा सामना करीत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर होवून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नाही, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात थोरात यांनी भाजप नेत्यांवर व पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना थोरात म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलिस व प्रशासन यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे, ही आजची गरज आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर उपलब्ध करणे, प्रयोगशाळांची संख्या वाढवणे, डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांना आवश्यक असलेले सुरक्षा कीट उपलब्ध करुन देणे तसेच राज्य सरकारांना जास्तीत जास्त मदत करणे, जनतेला धीर देणे हे त्यांचे काम आहे. दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का ? असा सवाल उपस्थित होत आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते. दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही इव्हेंट करुन परिस्थीतीचे गांभीर्य घालवले जात असल्य़ाची टीका थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com