राज्य सहकारी बॅंकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटींचा निधी 

राज्य सहकारी बॅंकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटींचा निधी 

पुणे : राज्य सहकारी बॅंकेने मुख्ममंत्री सहायता निधीला पाच कोटी रूपयांचा धनादेश आज दिला. बॅंकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निधीचा धनोदश आज सपूर्त केला. याबद्दल मुख्यमंत्री फडरवीस यांनी बॅंकेचे अभार मानले. मात्र, त्याचवेळी राज्यातील साखर कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, असे आवाहन केले. 

विविध व्यावसायिक कंपन्या, सहकारी संस्था तसेच सेवाभावी संस्था मुख्यमंत्री सहायता निधीला सातत्याने मदत करीत असतात. मात्र, राज्यातील बहुतांश सहकारी व खासगी साखर कारखाने मदत करीत नाहीत. या निधीचा उपयोग राज्यातील गरीब रूग्णांच्या उपचारांवर खर्च होतो. त्यामुळे साखर कारखान्यांनी मदत करताना मागे राहून चालणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

पुण्यात साखर परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर कारखानादारीपुढील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करताना मुख्यमंत्री सहायता निधीबाबतही भूमिका स्पष्ट केली. राज्यातील सर्वसामान्य माणसांपासून कार्पोरेट जगतातील कंपन्या या निधीला मदत करीत आहेत. मात्र, राज्यातील सहकारी साखर कारखाने यात मागे आहेत. वास्तविक या निधीच्या माध्यमातून राज्यातील गरीब व गरजू रूग्णांना मोठी मदत होत आहे. गेल्या चार वर्षात या निधीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. चार वर्षात मदत मिळालेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यामळे या निधीला मदत करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com