in state cabinet ncp 15 ministers including dy cm | Sarkarnama

 मंत्रिमंडळात "घड्याळा'चा वरचष्मा 

संजय मिस्कीन 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मुंबई : शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक मंत्रिपदे पारड्यात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. 43 जणांच्या मंत्रिमंडळात या पक्षाला सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्रिपदाचाही समावेश राहणार आहे. 

मुंबई : शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक मंत्रिपदे पारड्यात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. 43 जणांच्या मंत्रिमंडळात या पक्षाला सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्रिपदाचाही समावेश राहणार आहे. 

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह पंधरा मंत्रिपदे मिळणार आहेत. कॉंग्रेसला बारा मंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार असून, विधानसभा अध्यक्षपद अगोदरच या पक्षाला देण्यात आले आहे.
 
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्रिपदासह 43 मंत्रिपदे असतात. महाविकास आघाडीतला शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, मंत्रिपदाच्या वाटपात "राष्ट्रवादी'ने 16 पदे मिळवली आहेत.

2004 मधे "राष्ट्रवादी'च्या जागा सर्वाधिक असताना कॉंग्रेसला मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्या बदल्यात महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे "राष्ट्रवादी'ने पदरात पाडून घेतली होती. त्याच धर्तीवर आता शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने अधिकची मंत्रिपदे "राष्ट्रवादी'ने पटकावली आहेत. 

या सोळापैकी दहा कॅबिनेट व सहा राज्यमंत्रिपदे असतील, असे सांगण्यात येते. शिवसेनेकडे 12 कॅबिनेट व तीन राज्यमंत्रिपदे राहतील, असा दावा करण्यात येत असून, कॉंग्रेसला आठ कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे मिळतील, असा सूत्रांचा दावा आहे. 

"राष्ट्रवादी'कडे उपमुख्यमंत्रिपदासह गृह व अर्थ हे महत्त्वाचे विभाग येण्याचे संकेत आहेत. कृषी, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, रस्तेविकास महामंडळ, परिवहन यासारखे विभाग शिवसेना स्वत:कडे राखणार असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसला महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय व आदिवासी विकास ही महत्त्वाची मंत्रिपदे मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. 
....... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख