बालेकिल्ल्यावर 4223 कोटींचा वर्षांव!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापासून पवार कुटुंबातील सदस्यांचे सातारा जिल्ह्यावर प्रेम आहे. जिल्ह्याने कायम पवार यांच्या नेतृत्वाची पाठराखण केली आहे.
satara
satara

सातारा : आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यावर विशेष कृपा दाखविली. सातारा जिल्ह्यासाठी तब्बल 4223 कोटींची तरतूद पवार यांनी केली. यामध्ये साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत, मेडिकल कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि पाचगणी व महाबळेश्वर, वेण्णालेकच्या सुशोभिकरणाच्या कामांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच साताऱ्यात आले असताना मेडिकल कॉलेज, औद्योगिक वसाहत, संग्रहालय, कास धरण, महाबळेश्वर पाचगणीचा पर्यटन विकास हे मुद्दे राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी त्यांच्यापुढे मांडले होते. त्याचा विचार करून पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी तब्बल 4223 कोटींची तरतूद करून एकप्रकारे जिल्ह्यावर लक्ष्मीवर्षाव केला आहे. यामध्ये साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी 4000 कोटींची तरतूद केली आहे. तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पुढील वर्षी करण्याचा मनोदय व्यक्त करत त्यासाठी शंभर कोटींची तरतूद केली आहे. पाचगणी, महाबळेश्वर व वेण्णालेक परिसराचे सुशोभिकरणासाठी शंभर कोटी, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासाठी 12 कोटींची तरतूद केली आहे. यासोबतच रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 11 कोटी रूपये रूपयांची तरतूद केली आहे. 

सातारा जिल्हा बालेकिल्ला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापासून पवार कुटुंबातील सदस्यांचे सातारा जिल्ह्यावर प्रेम आहे. जिल्ह्याने कायम पवार यांच्या नेतृत्वाची पाठराखण केली आहे. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर सातारा जिल्ह्याने भरभरून पाठिंबा पवारांना दिला होता. त्यावेळेपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचे वारे वाहत असताना सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार व खासदार निवडून आले होते. तसेच 2019 च्या निवडणुकीतही जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ दिली. त्यामुळे साताऱ्यावर पवारांचे विशेष लक्ष असते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com