Devendra Fadnavis vs Uddhav Thakare
Devendra Fadnavis vs Uddhav Thakare

शिवसेनेपुढे  भाजपचे राज्यातील नेतृत्व  हतबल

..

मुंबई  :   चौदा  दिवस उलटून गेले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा कोणत्याही पक्षाकडून झालेला नाही.भाजप-शिवसेना युतीने लढून बहुमत प्राप्त केले तरीही त्यांच्यात सत्ता वाट्यावरून मतभेद आहेत .  आज भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन कायदेशीर बाबीवर सल्लामसलत  केली.


 भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. यानंतर सरकार स्थापन करण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घ्यावा,अशी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. शिवसेनेच्या या भुमिकेमुळे भाजपाचे राज्य नेतृत्व हतबल झाले आहे.


भाजप-शिवसेना युतीने लढले असून भाजपला 105 तर शिवसेनेला 56 असे 161  स्पष्ट बहुमत मिळाले आहे.मात्र ठरल्याप्रमाणे भाजपने शिवसेनेला सत्तेत वाटा दिला जात नाही यावरून  यूतीत मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,जलसःपदा मंत्री गिरीश महाजन आदींनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.


मात्र सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.यानंतर माध्यमाशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे.त्यामुळे राज्यातील जनतेची महायुतीचे सरकार व्हावे ही इच्छाआहे.याबाबत राज्यपालांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी भेट घेतली.त्यांना राजकीय परिस्थितीबाबत कल्पना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com