स्टॅलिनवरील आरोपामुळे द्रमुक कॉंग्रेसच्या बैठकीपासून दूर 

स्टॅलिनवरील आरोपामुळे द्रमुक कॉंग्रेसच्या बैठकीपासून दूर 

चेन्नई : तमिळनाडूतील स्थानिक स्वराज निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केल्याने द्रमुक पक्षाने सोमवारी दिल्लीतील विरोधी पक्षाच्या बैठकीपासून दूर राहणे पसंत केले. 

सीएएस, एनआरसी आणि एनपीआरसंदर्भात कॉंग्रेसने राजधानीत बैठक बोलावली होती.

तमिळनाडू कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अळगिरी यांनी काही दिवसांपूर्वी द्रमुकवर टीका केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी पक्ष द्रमुकने योग्य जागा दिल्या नाही आणि ही कृती आघाडी धर्माच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले होते. याबाबत त्यांनी स्टॅलिनला जबाबदार धरले होते. यानंतर कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला. 

या संदर्भात द्रमुकचे खासदार बालू म्हणाले, की अळगिरी यांचे वक्तव्य आमचे पक्षाचे नेते स्टॅलिन यांच्यावर आरोप करणारे होते. त्यामुळे आम्ही दिल्लीतील बैठकीत सहभागी झालो नाही.

परिणामी आजही बैठकीच्या दुसऱ्या दिवशी द्रमुक पक्ष पुन्हा कॉंग्रेसशी आघाडी करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. या दरम्यान अळगिरी यांनी खेद व्यक्त केला असून, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांची बाजूही मांडली आहे. 

त्यावर खासदार बालू यांनी बोलण्यास नकार दिला. द्रमुक आणि कॉंग्रेस यांचे सूर जुळतील की नाही हे येणारा काळच सांगेल, आपण का चिंता करता, असे बालू म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com