नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांच्या वादापुढे भाजपचे महापौर हतबल

शहरातील लेखानगर चौकाच्या सुशोभिकरणासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी लष्कराचा निकामी झालेला रणगाडा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शिवसेनेचे नगरसेवक कल्पना शिवाजी चुंभळे यांचाच विरोध आहे. हा वादा अनेक दिवस सुरु आहे. काल तो महासभेत पोहोचला. भाजपचे महापौर सतीष कुलकर्णी यांनी त्यात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही नगरसेवकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या तोफाच एव्हढ्या धडाडत होत्या की महापौर कुलकर्णीनाही माघार घ्यावी लागली.
ss nashik corporator differences over tank
ss nashik corporator differences over tank

नाशिक - शहरातील लेखानगर चौकाच्या सुशोभिकरणासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी लष्कराचा निकामी झालेला रणगाडा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शिवसेनेचे नगरसेवक कल्पना शिवाजी चुंभळे यांचाच विरोध आहे. हा वादा अनेक दिवस सुरु आहे. काल तो महासभेत पोहोचला. भाजपचे महापौर सतीष कुलकर्णी यांनी त्यात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही नगरसेवकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या तोफाच एव्हढ्या धडाडत होत्या की महापौर कुलकर्णीनाही माघार घ्यावी लागली.

भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या टी-55 रणगाडा प्रभाग 24 मधील लेखानगरमध्ये बसविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या परवानगी मिळून दीड वर्ष लोटले तरी रणगाडा बसविला जात नसल्याने त्यांनी सभागृहातच आंदोलन करत प्रशासनाचा निषेध म्हणून खेळण्यातील रणगाडा भेट देण्याचा प्रयत्न केला. ज्या जागेवर रणगाडा बसविण्याचा प्रस्ताव आहे, त्या जागेला शिवसेनेच्याच नगरसेविका कल्पना चुंभळे यांचा विरोध असून, या जागेवर अपघात होण्याची शक्‍यता व्यक्त करत प्रभागात मोकळ्या जागेवर रणगाडा बसविण्याचा त्यांचा आग्रह आहे. 

जागेवरून दोन्ही नगरसेवकांमधील प्रभागाचा वाद महासभेत पोचल्याने सत्ताधारी बाकावरून सदस्यांनी मनोरंजन म्हणून पाहिले. तर शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, तिदमे यांनी त्यास विरोध करताना मधे न पडण्याचा सल्ला दिला. शहर अभियंता संजय घुगे यांनी सारवासारव करताना रणगाडा बसविण्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केल्याचे सांगितले. महापौर कुलकर्णी यांनी प्रशासनाने दोन्ही नगरसेवकांना एकत्र करून वाद मिटविण्याचा सल्ला देत दोन दिवसांत जागेची पाहणी करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

रणगाडा बसविण्यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांतर्गत वाद महासभेत चव्हाट्यावर आले. नगरसेवक प्रवीण तिदमे व कल्पना चुंभळे यांनी एकमेकांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. वाद विकोपाला गेलेल्या महापौर सतीश कुलकर्णी यांनी मध्यस्थी करत दोन नगरसेवकांत समेट करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com