शिवसेनेचे आमदार फोडण्याची भाषा करणाऱ्या आमदार राणांविरुद्ध याचिका

शिवसेना पक्षाचे २५ आमदार फोडण्याची वल्गणा करणारे बडनेराचेआमदार रवी राणा यांच्या निवडणुक विजयलाच आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी दाखल केली आहे.
आमदार रवी राणा आणि शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे
आमदार रवी राणा आणि शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे

अमरावती ः शिवसेना पक्षाचे २५ आमदार फोडण्याची वल्गणा करणारे बडनेरा बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या निवडणुक विजयलाच आव्हान देणारी  याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी दाखल केली आहे.

आमदार राणा यांनी निर्धारित २८ लक्ष रू.खर्च मर्यादा ओलांडून सुमारे ४० लक्ष रुपयांचा निवडणूक खर्च केल्याचा अहवाल आयोगास जिल्हा प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे. याशिवाय आमदार राणा यांनी निवडणुकीमध्ये खुलेआम दिवाळीनिमित्त किराणा वाटपाचे कूपन वाटून मतदान मागितले आहे.

किराणा वाटपाबाबतचे कुपन्स निवडणूक प्रचारादरम्यान वाटत असतानाची विना परवानगी असलेली वाहने पोलिसांनकडून जप्त करण्यात आली होती. किराणा वाटपाच्या कुपनची नोद ऑब्झर्वर यांनी विशेष अहवालाद्वारे आयोगाच्या खर्च नोंदणी छायांकित रजिस्टरमध्ये घेतली होती. 

भ्रष्ट प्रवृत्तीचा वापर करून निवडणूक लढवीत असल्याबाबत निवडणूक प्रचारादरम्यान आमदार राणा यांना विविध प्रकारच्या नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. दिलेल्या नोटीसला उत्तर देण्याची संधी दिलेली असतानासुद्धा आमदार राणा यांच्या वतीने योग्य पद्धतीने उत्तर न दिल्यामुळे निवडणूक ऑब्झर्वर रामकृष्ण बंडी यांनी सदर प्रकारावर हरकती नोंदवून लेखापरीक्षकांच्या अहवालासह जिल्हाधिकारी यांना फौजदारी कार्यवाही साठी आदेश दिले होते. 

जिल्हाधिकारी यांच्या वतीनेही पोलिसांनी गुन्हे नोंदविलेले आहेत.तसेच निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक बाबी आमदार राणा यांच्याकडून लपवण्यात आल्या बाबतचे आरोप ही निवडणुक याचिकेमध्ये याचिकाकर्ते सुनील खराटे यांचे वकील  संदीप चोपडे व कौस्तुभ टोपले यांनी केले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com