पवार कुटुंब आणि पक्षात फूट : सुप्रिया सुळे यांचे व्हाॅट्सअॅप स्टेटस

अजित पवार यांनी भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही पवार कुटुंब आणि पक्षात उभी फूट असल्याची मूक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाॅटसअॅप स्टेटस द्वारे व्यक्त केली आहे.
Split in NCP and Pawar Family Supriya Sule on Ajit Pawars Decisssion
Split in NCP and Pawar Family Supriya Sule on Ajit Pawars Decisssion

पुणे : अजित पवार यांनी भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही पवार कुटुंब आणि पक्षात उभी फूट असल्याची मूक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाॅटसअॅप स्टेटस द्वारे व्यक्त केली आहे. 

तीन पक्षांची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले. यापूर्वीही महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.

भाजपने शिवसेनेचा मध्यरात्री गेम केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाला संमती दोन्ही काँग्रेसने दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सरकार स्थापन केले. राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. तर ही पवार कुटुंब आणि पक्षात फूट असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com