Spiritual events also sponsored by Politicians now | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

'अर्थ'पूर्ण अध्यात्म : भावी उमेदवारांनी स्वीकारले नामवंत कीर्तनकारांचे प्रायोजकत्व !

सरकारनामा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

यातील काही किर्तनकारांना 'सौजन्य' हे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, त्याची पत्नी राजवर्धीनी जगताप, राष्टवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या वतीने आहे.

माळशिरस: पुरंदर तालुक्यात सध्या जवळ आलेल्या विधानसभेच्या तयारीसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्टवादी काँग्रेसचे नेते मंडळी जोरात तयारीला लागले आहेत.

वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांशी व मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसत असून अगदी अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमातूनही लोकांच्या पर्यत जाताना दिसू लागले आहेत. 

पुरंदर तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्दास्थान असलेल्या नायगाव येथील श्री सिदधेश्वर व माता जोगेश्वरीच्या मंदीरात सध्या अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तालुक्यात सर्वात मोठ्या उत्साहात येथे सप्ताह होतो. या सप्ताहात राज्यातील नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा होते. यामुळे येथे मोठ्या संख्येने परिसरातील व तालुक्यातील लोक किर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. 

या वर्षीचा सप्ताह सध्या सुरु झाला असून या मध्ये राज्यातील प्रसिध्द किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख,बंडा महाराज कराडकर,रामायनाचार्य माधवजी महाराज रसाळ, संजय महाराज पाचपोर,सोपान महाराज सानप,नामदेव आप्पा शामगावकर, सुधाकर वाघ,भरत जोगी या दिग्गज किर्तनकारांची किर्तन सेवा आहे. 

यातील काही किर्तनकारांना सौजन्य हे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, त्याची पत्नी राजवर्धीनी जगताप, राष्टवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या वतीने आहे.

रविवारी  रात्रीच्या संजय जगताप यांच्या वतीने असणा-या निवृत्ती महाराज देशमुखांच्या किर्तन सेवेला श्री जगताप यांनी स्वतः हजेरीही लावली.

मागील निवडणूकीत हे तिघेही परस्परांच्या विरोधात आपआपल्या पक्षाकडून उमेदवार होते. व आताही निवडणूकीच्या तयारीत आहेत. त्यांच्या या सौजन्यामुळे गावक-यांचा भार हलका होण्याबरोबरच चांगल्या किर्तनकारांची किर्तनेही एकावयास मिळत आहेत. या  अर्थपूर्ण अध्यात्माची पंचक्रोशीत चर्चा आहे .  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख